शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा, विजयाबाईंच्या फिर्यादीत पोलिसच जबाबदार; सीआयडीसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:40 IST

माझ्या मुलाच्या मृत्यूस मोंढा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचेही फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.    

परभणी :  अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मयताच्या आईने सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला.  मात्र, यात आरोपी अज्ञात असून, ते शोधण्याचे आव्हान सीआयडीसमोर राहणार आहे. 

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल होती. तिचा निकाल ३० जुलैला लागला. त्यानंतर सोमनाथची आई विजयाबाई  यांच्या १८ डिसेंबर २०२४ च्या अर्जावरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच फिर्यादीत मयत सोमनाथचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याने आमिष  दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर नवा मोंढा पोलिस लॉकअपमध्ये पोलिसांनी सतत तीन दिवस मारहाण केल्यामुळे  सोमनाथ यांचे निधन झाल्याचाही आरोप आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूस मोंढा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचेही फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.    

पोलिसांच्या कोठडीत १५ डिसेंबरला झाला मृत्यू -परभणीत १० डिसेंबरला संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी शहरात  आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला होता. यात सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास नवा मोंढा पोलिस ठाण्यात नेले होते. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा १५ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.सोमनाथ यांना न्याय मिळावा यासाठी विजयाबाईंकडून ही सर्व न्यायालयीन लढाई स्वत: ॲड. आंबेडकर यांनी लढली.  या न्यायाचे आणि लढाईचे श्रेय विजयाबाई सूर्यवंशी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParbhani policeपरभणी पोलीस