मानवतमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण; २५ हजारांच्या खंडणीसाठी रेल्वे पुलावरून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:00 IST2026-04-13T17:00:03+5:302026-04-13T17:00:31+5:30

या घटनेत विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे

Horrific Crime in Parbhani: Pharmacy Student Abducted and Thrown Off Railway Bridge in Manwat Over Rs 25k Ransom. | मानवतमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण; २५ हजारांच्या खंडणीसाठी रेल्वे पुलावरून फेकले

मानवतमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण; २५ हजारांच्या खंडणीसाठी रेल्वे पुलावरून फेकले

- मोहन बारहाते
मानवत :
शहरात फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न करत खंडणीसाठी मारहाण करून त्याला रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सय्यद सुफियान सय्यद शाकेर (वय १९, रा. उस्मानिया कॉलनी, परभणी) हा विद्यार्थी मानवत येथील फार्मसी महाविद्यालयात डी. फार्मसी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सोमवार सकाळी सुमारे १० वाजता तो कॉलेजकडे जात असताना महाराणा प्रताप चौक परिसरात अल्टो कार त्याच्या जवळ थांबली. कारमधील मास्कधारी इसमांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले.

यानंतर विद्यार्थ्याकडे २५ हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील १ हजार रुपये काढून घेतले आणि त्यानंतर मानवतरोड येथील रेल्वे उड्डाणपुलावरून त्याला खाली फेकले. या घटनेत विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थ्याने त्याचे वडील सय्यद शाकेर यांना कळवल्यानंतर त्याला तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली असून या क्रूर प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : मानवत में छात्र का अपहरण, फिरौती के लिए पुल से फेंका

Web Summary : मानवत में एक फार्मेसी छात्र का अपहरण कर फिरौती के लिए पीटा गया और रेलवे पुल से फेंक दिया गया। अपहरणकर्ताओं ने 25 हजार रुपये की मांग की थी। पुलिस मामले की जांच कर रही है। इस घटना से इलाके में दहशत का माहौल है।

Web Title : Student Abducted, Thrown off Bridge for Ransom in Manvat

Web Summary : A pharmacy student was abducted in Manvat, beaten for ransom, and thrown from a railway bridge. He suffered severe injuries after kidnappers demanded 25,000 rupees. Police are investigating the shocking incident, which has created fear in the area.