तेल भांडारात आगीचे रौद्ररूप; हजारो क्विंटल करडी, सूर्यफुलासह तेल खाक, ७० लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:32 IST2026-05-05T12:30:56+5:302026-05-05T12:32:10+5:30

"रविवारची सुटी ठरली देवाची कृपा!" कामगार नसल्याने अनर्थ टळला; झरी येथील ७० लाखांच्या अग्नितांडवाचा पंचनामा.

Fire breaks out in oil depot in Zhari of Parabhani; Thousands of quintals of oil, sunflowers and other items burnt, loss of Rs 70 lakhs | तेल भांडारात आगीचे रौद्ररूप; हजारो क्विंटल करडी, सूर्यफुलासह तेल खाक, ७० लाखांचे नुकसान

तेल भांडारात आगीचे रौद्ररूप; हजारो क्विंटल करडी, सूर्यफुलासह तेल खाक, ७० लाखांचे नुकसान

झरी (जि. परभणी) : परभणी तालुक्यातील झरी येथील तेल भंडारला शाॅर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत ४५० क्विंटल करडी, २६० क्विंटल सूर्यफूल, ३६० किलो तेलासह साहित्य खाक झाले. अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाले असून घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली.

झरी येथील जिंतूर-परभणी रोडवर महरुद्र बद्रीनारायण शिरडकर यांचे महारुद्र तेल भांडार आहे. या ठिकाणी करडी, सूर्यफुलासह इतर खाद्यतेल तयार केले जाते. सोमवारी पहाटे २ ते ४ वाजेदरम्यान दुकानात शाॅर्टसर्कीटने आग लागली. पहाटे हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ ही माहिती भांडार मालकाला दिली. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेकडो क्विंटल करडी, सूर्यफूल, तेलासह यंत्रसामग्री खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने धाव घेत आग आटोक्यात आणली. महारुद्र शिरडकर यांनी दिलेल्या खबरीनुसार दुकानातील ४५० क्विंटल करडी, २६० क्विंटल सूर्यफूल, ३६० किलो तेल, ९० क्विंटल करडी पेंडसह तेल काढण्याची मशीन साहित्य मिळून ७० लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. याप्रकरणी सपोनि. राजगुरू यांच्या आदेशाने आकस्मिक घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सपोउपनि. तावरे करीत आहेत.

रविवार सुटी असल्याने अनर्थ टळला
रविवारी तेल भंडारमध्ये कामगारांना सुटी असल्याने भांडार बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचा धान्यसाठा खाक झाला. घटनेचा महसूल प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला.

Web Title : परभणी में तेल डिपो में भीषण आग, 70 लाख का नुकसान

Web Summary : परभणी के ज़री में शॉर्ट सर्किट से तेल डिपो में आग लग गई। सैकड़ों क्विंटल करडी, सूरजमुखी के बीज और तेल नष्ट हो गए। अनुमानित नुकसान ₹70 लाख है। रविवार की छुट्टी होने के कारण कोई हताहत नहीं हुआ।

Web Title : Fire Ravages Oil Depot in Parbhani, Losses Estimated at 7 Million

Web Summary : A fire, triggered by a short circuit in Zari, Parbhani, destroyed an oil depot. Hundreds of quintals of safflower, sunflower seeds, and oil were lost. The estimated damage is ₹70 lakhs. No casualties occurred due to Sunday being a holiday.