शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

शशांक मनोहर आयसीसी चेअरमनपदी बिनविरोध

By admin | Updated: May 13, 2016 03:30 IST

ज्येष्ठ क्रिकेट संघटक अ‍ॅड. शशांक मनोहर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून बिनविरोध विराजमान झाले आहेत.

दुबई : ज्येष्ठ क्रिकेट संघटक अ‍ॅड. शशांक मनोहर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून बिनविरोध विराजमान झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आयसीसीच्या पूर्ण सदस्यीय बोर्डाने प्रस्तावित घटनात्मक सुधारणेस मंजुरी प्रदान करताच ५८ वर्षांचे मनोहर यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. ते आयसीसीचे पहिले बिनविरोध स्वतंत्र चेअरमन आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ लगेच सुरू झाला. आयसीसी निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सर्व संचालकांना आजी किंवा माजी संचालकांमधून एका व्यक्तीचे नाव सुचविण्याची मुभा असते. निवडणूक लढविण्यासाठी अर्जावर दोन पूर्णकालीन सदस्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. मनोहर हे या पदासाठी एकमेव उमेदवार होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सांभाळणारे आॅडिट समितीचे स्वतंत्र अध्यक्ष अदनान झैदी यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून मनोहर यांच्या नावाची घोषणा केली. मनोहर हे २००८ ते २०११ या कालावधीत बीसीसीआयचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांना आॅक्टोबर २०१५ मध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपद बहाल करण्यात आले. याच आधारे ते आयसीसी चेअरमन बनले होते. आयसीसी अध्यक्षपद आता मोडीत निघणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर क्रिकेटला स्वच्छ आणि पारदर्शी बनविण्याचा निर्धार करणारे मनोहर यांनी सात महिन्यांनंतर बीसीसीआय अध्यक्षपद सोडले. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करीत बीसीसीआयमध्ये पायाभूत सुधारणा घडून येण्याआधीच मनोहर यांनी स्वत:ला अलिप्त करून घेतल्याबद्दल क्रीडा वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. (वृत्तसंस्था)>‘‘आयसीसीचा स्वतंत्र चेअरमन बनणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. माझ्या क्षमतेवर विश्वास दाखविणाऱ्या आयसीसी संचालकांचा; तसेच बीसीसीआय प्रमुख असताना मला सहकार्य करणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. २०१४ च्या घटनादुरुस्तीची समीक्षा करीत असताना क्रिकेटचा विकास; तसेच सर्व संलग्न देशांना एका माळेत गुंफण्याची किमया साधत सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट या खेळाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम करायचे आहे.’’- शशांक मनोहर, चेअरमन आयसीसी>कानपूर : आयसीसी चेअरमनपदी बिनरोध निवड झालेल्या शशांक मनोहर यांचे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी अभिनंदन केले. शुक्ला म्हणाले,‘‘मनोहर यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट नक्कीच नवी उंची गाठेल.’’ बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत शुक्ला म्हणाले, की याबाबत अद्याप कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही.नवी दिल्ली : शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आयसीसीच्या माध्यमातून क्रिकेटला जागतिक पातळीवर ते एका नव्या उंचीवर पोहोचवतील. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आयसीसीला नक्कीच फायदा होईल, असे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी मनोहर यांच्या आयसीसी अध्यक्षपदाच्या कार्यासाठी शुभेच्छा देताना व्यक्त केले.