शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
6
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
7
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
8
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
9
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
10
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
11
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
12
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
13
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
14
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
15
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
16
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
17
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
18
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
19
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
20
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

सायनाची विजयी सलामी

By admin | Updated: October 14, 2015 23:54 IST

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल हिने ६ लाख ५० हजार डॉलर बक्षिसांच्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या

ओंडेसे : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल हिने ६ लाख ५० हजार डॉलर बक्षिसांच्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत थायलंडची बुसानन ओंगबुमरंगफान हिच्यावर मात करीत विजयी सलामी दिली. तीन वर्षांआधी येथे विजेतेपद पटकविणाऱ्या सायनाने जपान ओपनमध्येदेखील बुसाननला नमविले होते.एक तास नऊ मिनिटे चाललेल्या या संघर्षात सायनाने २३-२१, १४-२१, २१-१८ अशा फरकाने विजय साजरा केला. पुढील फेरीत सायनाला जपानची मिनात्सु मितानी आणि थायलंडची पोर्नतिप यांच्यातील विजेतीविरुद्ध खेळावे लागेल. बुसानने सुरुवातीला ८-४ अशी आघाडी मिळविली होती; पण सायनाने मुसंडी मारून ९-९ अशी बरोबरी साधली. प्रतिस्पर्धी खेळाडूने पुन्हा एकदा २०-१८ अशी आघाडी मिळविली. सायनाने मात्र सलग तीन गुणांची कमाई करीत गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये बुसानने ७-४ अशी आघाडी घेतली. सायनाने या गेममध्येही मुसंडी मारण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण थायलंडच्या खेळाडूने पकड घट्ट करीत गेम जिंकताच लढत बरोबरीत आली होती. निर्णायक गेममध्ये सायनाने ६-२ अशी आघाडी मिळविल्यानंतरही बुसानने ६-६ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यानंतरही सामना बरोबरीत सुरूच होता. एकवेळ ११-११ असा गुणफलक होता. बे्रकनंतर सायनाने १३-१२ अशी आघाडी घेतली व ती १८-१२ वर नेली. थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने परतण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले; पण सायनाच्या आक्रमकतेपुढे तिची डाळ न शिजल्याने सायनाने गेम आणि सामना खेचून नेला.(वृत्तसंस्था)