शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकी धावपटूंना खेळवणे म्हणजे ‘मानवी तस्करी’; एएफआय प्रमुख आदिल सुमारीवाला यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 02:38 IST

‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी केली.

मुंबई : ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी केली.मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुमारीवाला यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सरचिटणीस जय कोवली, माजी कुस्तीपटू आणि आघाडीचा कुस्तीपटू राहुल आवरे याचे प्रशिक्षक काका पवार आणि माजी आॅलिम्पियन नेमबाज व प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचीही उपस्थिती होती.सुमारीवाला यावेळी म्हणाले की, ‘मला वाटते की, अरब देश बाहेरुन खेळाडू मागवतात. ते स्पर्धेपुरता त्यांचा वापर करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या देशात पाठवतात. एकूण अरब देश जे काही करत आहेत ते चुकीचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अरब देशांकडून खेळताना आफ्रिकी खेळाडू योग्य मार्गाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवत नाही,’ असेही सुमारीवाला यांनी यावेळी म्हटले.या सर्व प्रक्रीयेमध्ये होत असलेल्या अनेक गैरव्यवहाराविषयी सुमारीवाला म्हणाले की, ‘आफ्रिकी खेळाडूंना अरब देशांचे नागरिकत्व दिले जात नाही. त्यांना केवळ घर दिले जाते. तसेच अवैध पासपोर्ट दिले जाते, ज्याआधारे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. स्पर्धेत भाग घेतल्यानंत त्यांना अक्षरश; फेकले जाते आणि हे मानवी तस्करी आहे. याविषयी मी आयएएएफच्या बैठकीमध्येही विरोध केला आहे.’ त्याचप्रमाणे यावेळी जय कोवळी, काका पवार आणि दिपाली देशपांडे यांनीही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आव्हाने, अडचणी यांसह सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीविषयी विस्तृत चर्चा केली.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा