शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऑरेंज व पर्पल कॅप भारतीय खेळाडूंकडे

By admin | Updated: May 6, 2015 02:33 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट घेणार्‍या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंवर वर्चस्व गाजवले आहे.

नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट घेणार्‍या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंवर वर्चस्व गाजवले आहे. सध्या ऑरेंज व पर्पल कॅप भारतीय खेळाडूंच्या डोक्यावर आहे. राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे (४३० धावा) फटकावणार्‍या फलंदाजांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. अनेक दिवसांपासून ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा (१७ बळी) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. नेहराने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध तीन बळी घेतले होते. रहाणेला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डेव्हिड वॉर्नरकडून कडवे आव्हान मिळत आहे. वॉर्नरने ९ सामन्यांत ३८२ धावा फटकावल्या आहेत. चेन्नई संघाचा ब्रेन्डन मॅक्युलम (३१५) तिसर्‍या, बंगळुरूचा विराट कोहली (३०३) चौथ्या आणि मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा (२९७) पाचव्या स्थानी आहे. आयपीएलच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल व ऑस्ट्रेलियाचा माईक हसी यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. गेलने २०१२ मध्ये या स्पर्धेत ७३३ धावा फटकावल्या होत्या; तर हसीने २०१३ मध्ये ७३३ धावा फटकावण्याची कामगिरी केली होती. सर्वाधिक बळी घेणार्‍या आशीष नेहराला त्याचा चेन्नई संघाचा सहकारी ड्वेन ब्राव्होचे आव्हान आहे. ब्राव्होने १० सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. दिल्ली डेअर डेव्हिल्सचा लेगस्पिनर इम्रान ताहिर, हैदराबादचा भुवनेश्वर कुमार व मुंबईचा लसिथ मलिंगा यांच्या नावावर प्रत्येकी १३ बळींची नोंद आहे. ब्राव्होच्या नावावर एका स्पर्धेत सर्वाधिक ३२ बळी घेण्याच्या कामगिरीची नोंद आहे. ब्राव्होने हा पराक्रम २०१३ मध्ये केला होता. लसिथ मलिंगाने २०११ मध्ये २८ बळी व जेम्स फॉल्कनरने २०१३ मध्ये २८ बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)