शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

...आता येईल खरा रंग

By admin | Updated: March 16, 2015 02:20 IST

आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीचा टप्पा आटोपला असून,

मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीचा टप्पा आटोपला असून, आता १८ मार्चपासून (बुधवार) उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार आहे. बाद फेरी गाठणारे अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींसाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी सिडनी क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि १९९६चा विजेता श्रीलंका या संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना रंगणार आहे. ४२ लढतींच्या साखळी फेरीत अखेरच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा श्रीलंका संघ ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराने साखळी फेरीत सलग चार शतके झळकाविण्याचा विक्रम नोंदविला. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये संगकारा आघाडीवर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघाला या स्पर्धेत साखळी फेरीत भारत व पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार ए बी डिव्हिलियर्सने ६ सामन्यांत ४१७ धावा फटकाविल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत गतचॅम्पियन भारतीय संघाला आशियाई प्रतिस्पर्धी बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांदरम्यान १९ मार्चला गुरुवारी एमसीजीवर लढत होईल. जाणकारांच्या मते, उपांत्यपूर्व फेरीत भारताला सर्वांत सोपे आव्हान मिळाले आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मार्ग खडतर नसला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडूंनी आत्ममश्गूल राहू नये, असे धोनीने संघ सहकाऱ्यांना बजावले आहे. बांगलादेश संघाने इंग्लंडला स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले आहे.२० मार्चला आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीची तिसरी लढत रंगणार आहे. ही लढत अ‍ॅडिलेडमध्ये खेळली जाणार आहे. त्यानंतर २१ मार्चला न्यूझीलंड व वेस्ट इंडीज संघांदरम्यान वेलिंग्टनमध्ये उपांत्यपूर्व फेरीची चौथी लढत होणार आहे. सिडनी व वेल्ािंग्टन येथे खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील विजेत्या संघांदरम्यान आॅकलंड येथे उपांत्य लढत होईल, तर मेलबोर्न व अ‍ॅडिलेड येथील उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या संघांची गाठ उपांत्य फेरीत सिडनी येथे पडणार आहे. (वृत्तसंस्था)