शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नासीरची अष्टपैलू खेळी, बांगलादेश-अ विजयी

By admin | Updated: September 19, 2015 03:44 IST

नासीर हुसेन याने प्रथम प्रतिकूल परिस्थितीत केलेले नाबाद शतक आणि त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेश अ संघाने दुसऱ्या अनधिकृत

बंगळुरू : नासीर हुसेन याने प्रथम प्रतिकूल परिस्थितीत केलेले नाबाद शतक आणि त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेश अ संघाने दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज येथे भारत अ संघाचा ६५ धावांनी पराभव करताना ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.एन. चिन्नास्वामी स्टेडियममधील आजचा पूर्ण दिवसच २३ वर्षीय अष्टपैलू मोहंमद नासीर हुसेन याच्या नावावर राहिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशाची ५ बाद ८२ अशी स्थिती असताना त्याने खेळपट्टीवर पाय ठेताना ९६ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह नाबाद १०२ धावा केल्या आणि आपल्या संघाला ८ बाद २५२ पर्यंत मजल मारून दिली. हुसेनने लिट्टन दास (४५) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ७० आणि नंतर अराफात सनी (१७) याच्याबरोबर सातव्या गड्यासाठी केलेल्या ५० धावांच्या भागीदाऱ्यांमुळे बांगलादेशाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची एकवेळ २ बाद १३७ अशी चांगली स्थिती होती; परंतु भारताने २ बाद १३७ अशा चांगल्या स्थितीतून २० धावांतच ६ फलंदाज गमावल्यामुळे त्यांची स्थिती ८ बाद १५७ अशी बिकट झाली. त्याला कारणीभूत ठरणाऱ्या नासीर हुसेनने जादुई फिरकी गोलंदाजी करताना ३६ धावांत ५ गडी बाद केले. त्याच्या कामगिरीमुळे बांगलादेशाने भारत अ संघाचा डाव ४२.२ षटकांत १८७ धावांत गुंडाळला.नासीर हुसेनला वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनची चांगली साथ मिळाली. रुबेलने ३३ धावांत ४ गडी बाद केले. भारताकडून कर्णधार उन्मुक्त चंदने सर्वाधिक ५६ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरणारा गुरकीरतसिंग मान ३४ धावा काढून अखेरच्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला. या दोन संघांतील अखेरचा तिसरा एकदिवसीय सामना २० सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.संक्षिप्त धावफलक :बांगलादेश अ : ५० षटकांत ८ बाद २५२. (नासीर हुसेन नाबाद १०२, लिट्टन दास ४५, अनामुल हक ३४, सौम्या सरकार २४. रिषी धवन ३/४४, करण शर्मा २/४०, रुश कलेरिया १/३५, सुरेश रैना १/२१)भारत अ : ४२.२ षटकांत सर्व बाद १८७. (उन्मुक्त चंद ५६, मयंक अग्रवाल २४, मनीष पांडे ३६, सुरेश रैना १७, गुरकीरतसिंग ३४, नासीर हुसेन ५/३६, रुबेल हुसेन ४/३३).