शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विजयी

By admin | Updated: February 26, 2017 04:08 IST

धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात महाराष्ट्राने मोक्याच्या वेळी टिच्चून मारा करून हिमाचल प्रदेशाचा २५ धावांनी पराभव करून विजय हजारे स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पुणे : धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात महाराष्ट्राने मोक्याच्या वेळी टिच्चून मारा करून हिमाचल प्रदेशाचा २५ धावांनी पराभव करून विजय हजारे स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद ३७६ धावांचा हिमालय उभारल्यानंतर हिमाचल प्रदेशानेही तोडीस तोड फटकेबाजी करीत सामना रोमांचक केला. परंतु, त्यांचे प्रयत्न २५ धावांनी कमी पडले. ऋतुराज गायकवाडच्या (१३२) दमदार शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद ३७६ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशाने त्याच तोडीची फटकेबाजी केली. सलामीवीर प्रशांत चोप्राने ८५ चेंडूंत १०० धावा काढून महाराष्ट्राचा विजय जवळजवळ हिसकावलाच होता. परंतु, जगदीश झोपेने चोप्राची बॅट शांत करून महाराष्ट्राची धावपळ थांबवली. रॉबिन बिस्त (४६) आणि पारस डोग्रा (२५) यांनी संघाला काही प्रमाणात सावरले.परंतु, ठराविक अंतराने बळी मिळवताना महाराष्ट्राने अखेरपर्यंत वर्चस्व मिळविले. दरम्यान, अंकित कौशिकने मधल्या काही षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करीत ३४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५९ धावा चोपल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने बळी जात राहिल्याने त्याची झुंज अपयशी ठरली. जगदीश झोपे (४/६०) आणि श्रीकांत मुंढे (३/७५) यांनी चांगला मारा केला.तत्पूर्वी, ऋतुराजने ११० चेंडंूत १२ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करीत ११० चेंडंूत १३२ धावांचा तडाखा दिला. त्याला उपयुक्त साथ दिलेल्या विजय झोलने ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ६२ धावा काढल्या. या दोघांनी १६७ धावांची शानदार सलामी संघाला दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर नौशाद शेख (३९ चेंडूत ७२) आणि श्रीकांत मुंढे (२० चेंडूंत ४२) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राने धावांचा डोंगर उभारला. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : ५० चेंडंूत ७ बाद ३७६ धावा (ऋतुराज गायकवाड १३२, विजय झोल ६२, नौशाद शेख ७२; पंकज जैसवाल २/८२) वि.वि. हिमाचल प्रदेश : ४८.५ षटकांत सर्व बाद ३५१ धावा (प्रशांत चोप्रा १००, अंकित कौशिक नाबाद ५९; जगदीश झोपे ४/६०, श्रीकांत मुंढे ३/७५).