शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भारतापुढे दुसरे स्थान गमावण्याचा धोका

By admin | Updated: January 22, 2016 03:02 IST

आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे. भारताला जर सिडनी येथे २३ जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तर तो भारतीय संघाचा ४०० वा पराभव ठरेल. भारताने मालिकेतील पहिल्या चारही सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली, पण मोक्याच्या क्षणी चुका झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या लढतीत विजय मिळवण्याची चांगली संधी असताना भारतीय संघाने ती गमावली. क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राखण्यात आता भारताला २३ जानेवारी रोजी सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. भारताला मालिकेत ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला तर भारतीय संघ क्रमवारील दक्षिण आफ्रिकेपेक्षा पिछाडीवर पडेल. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड संघांचे समान १११ मानांकन गुण राहतील, पण दशांश गुणांच्या फरकाने भारतीय संघ तिसऱ्या आणि न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर राहील. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी दाखल झाला आहे, पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाचवी लढत गमावल्यानंतर वन-डे क्रमवारीत भारताची घसरण होणार आहे. मालिकेपूर्वी आॅस्ट्रेलिया (१२७) अव्वल तर भारत (११४) दुसऱ्या स्थानी होता. दक्षिण आफ्रिका (११२) संघ तिसऱ्या स्थानावर होता. (वृत्तसंस्था)> भारताने आतापर्यंत एकूण ८९५ सामने खेळले असून जगातील अन्य संघांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. भारताने यात ४५० सामने जिंकले असून ३९९ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सात सामने टाय झाले तर ३९ सामन्यांत निकाल शक्य झाला नाही.दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया संघाने ८६६ सामन्यांत ५३७ विजय मिळवले आहेत तर त्यांना २८९ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.