शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:25 IST

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नवी मुंबई : सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून साधारण मे २0२0 मध्ये या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो धावेल, असे कयास बांधले जात आहेत. मात्र कामाची गती पाहता हा मुहूर्त सुद्धा हुकण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. विमानतळाला जोडणाऱ्या या प्रकल्पाची चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर हा ११ किमी लांबीचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर ११ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा सिडकोने केला आहे.सध्या ९५ टक्के कामे पूर्ण झाली असून स्थानकाची कामे काही प्रमाणात अर्धवट आहेत. त्याचबरोबर मेट्रो धावण्यासाठी आवश्यक असणाºया अनेक लहान मोठ्या गोष्टींची पूर्तता करणे बाकी आहे. ही उर्वरित कामे पुढील काही महिन्यात पूर्ण करून अंतिम चाचणी घेतली जाईल. त्यानंतर या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेला सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागेल, असे सिडकोकडून सांगण्यात येत आहे. परंतु ही कामे अत्यंत कुर्मगतीने सुरू आहेत. त्यामुळे शिल्लक कामे पूर्ण करून आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावरून सिडकोने मेट्रोसाठी दिलेला मे २0२0 चा मुहूर्त सुध्दा नवी मुंबईकरांना हुलकावणी देण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.।मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाचणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात तळोजा येथील मेट्रो डेपोत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षात मेट्रोची सेवा सुरू होईल, असा दावा केला जात आहे. मात्र पहिल्या टप्प्याच्या मार्गात अपूर्ण असलेली कामे पाहता हा दावा फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.