शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

वरसे येथील पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल

By admin | Updated: July 5, 2017 06:41 IST

तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीत पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यामुळे हा व्हिडीओ

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीत पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यामुळे हा व्हिडीओ खोटा आहे, या दृश्यातील पाण्याची टाकी वरसे विभागातील नाही, अफवांवर विश्वासू ठेवू नका अशी उत्तरे देण्याचा बाका प्रसंग ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर आला आहे. अत्यंत उंचावर असलेली पाण्याची टाकी खाली कोसळत असताना, त्याचवेळी अनेक तरुण पळत आहेत. त्यानंतर पाण्याची टाकी रस्त्यावर खाली पडली आणि त्यातून हजारो लिटरचे पाणी वाया जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र अफवा पसरली. काय झाले? कसे झाले, खरे आहे का ? अशी विचारणा सुरू झाली. यामुळे सरपंच, ग्रामसेवकांना अफवा असल्याचे सांगताना नाकीनऊ आले. अखेर खोडसाळ व्हिडीओ व्हायरल विरोधात वरसे ग्रामपंचायतीने रोहा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात सायबर गुन्हेगार पकडला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहा शहराला लागून असलेली वरसे ग्रामपंचायत आधीच विविध मुद्द्यांनी कायम चर्चेत आहे. यामुळे साऱ्यांचे याकडे लक्ष आहे.वरसे ग्रामपंचायतीत पाण्याची टाकी कोसळली असा धक्कादायक व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. मात्र, वरसेत अशी घटना घडलीच नाही, व्हायरल व्हिडीओे खोडसाळ आहे, कोणीतरी बदनामीचे कारस्थान केले असे स्पष्टीकरण ग्रामसेवक आर.एस.पाटील यांनी दिले, तर त्या अज्ञाताबाबत रोहा पोलिसांत तक्र ार केल्याची माहिती सरपंच मीना म्हात्रे यांनी दिली. पाणी, रस्ते, गटारे कसलेच नीटनेटके नियोजन नाही, जास्तीची मुभा दिलेल्या मुख्यत: बाहेरील बिल्डरांच्या अव्वाच्या सव्वा बांधकामांनी उद्याच्या सुस्थितीत नागरीकरणात अडथळा निर्माण केला अशा अनेक समस्यांमुळे वरसे ग्रामपंचायत कायम चर्चेत आहे.