शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:27 IST

सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उरण फाटा, शिरवणे तसेच एल.पी. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्याठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या काही ठिकाणचे काँक्रीटीकरण वगळता नव्याने बनवण्यात आलेल्या पुलांचाही त्यात समावेश आहे. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावरील पुलांची खड्ड्यांमुळे चाळण होत आहे. त्यात उरण फाटा येथील पूल, नेरुळचा एल.पी. पूल व शिरवणेतील पुलाचा समावेश आहे. या पुलांवरील खड्ड्यांमुळे त्याठिकाणी अनेक अपघात देखील झाले असून, त्यामध्ये कित्येकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. यानंतर खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे केली जातात. मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा सर्वत्र खड्डे पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे मागील दोन वर्षात सायन-पनवेल मार्गावर झालेल्या कामांच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर याचा फटका छोट्या-मोठ्या वाहनमालकांना बसत असून, प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबई-पुण्याला जोडणारा सायन-पनवेल मार्ग महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर शेकडो वाहनांची रहदारी सुरू असते. त्यात अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. मात्र सातत्याने होणाºया वाहतूककोंडीत रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याने, त्यामधील रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप होत आहे. तर याच वाहतूककोंडीमुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्यास त्याची प्राणज्योत मावळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. वाशी खाडीपुलावर देखील खड्डे पडले असून त्यामध्ये वाहने अडकून नुकसान होत आहे. सोमवारी सकाळी मुंबईकडे जाणाºया एका सिमेंट मिक्सर वाहनाचे एक्सेल या खड्ड्यात आपटून तुटले. त्यामुळे रहदारीसाठी एक लेन बंद झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने भीषण अपघात झाला नाही. परंतु सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत असतानाही, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप होत आहे.