शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांवर वाढला अकृषिक कराचा बोजा

By admin | Updated: March 18, 2017 04:06 IST

तालुक्यातील सिडको नोडमधील रहिवाशांना अकृषिक कर भरण्यासंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातून गेल्या महिना-दीड महिन्यांपासून नोटिसा पाठण्यिात येत आहेत.

- वैभव गायकर,  पनवेल

तालुक्यातील सिडको नोडमधील रहिवाशांना अकृषिक कर भरण्यासंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातून गेल्या महिना-दीड महिन्यांपासून नोटिसा पाठण्यिात येत आहेत. हा कर न भरल्यास रहिवाशांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही यात नमूद करण्यात आल्याने रहिवासी संभ्रमात आहेत. पनवेल तहसील कार्यालयामार्फत जवळपास साडेनऊ हजार नागरिकांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे आदी ठिकाणच्या रहिवासी संकुलांचा यात समावेश आहे. सिडकोने याठिकाणचे भूखंड ६० वर्षांच्या भाडेकरारावर दिले आहेत. आजही संबंधित जमिनीचे मालक सिडको प्राधिकरण आहे. सिडको नोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना सिडकोकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे संबंधित अकृषिक कर तहसील कार्यालयाने सिडकोकडून वसूल करावा, अशी मागणी पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन देऊन सदर नोटिसा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही नोटिसांचे सत्र सुरू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी रहिवाशांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. तहसील कार्यालयाच्या महसुलात अकृषिक कराच्या रूपात २० लाख रुपये जमाही झाले आहेत. सिडको नोडमधून सुमारे १ कोटी ७१ लाख रुपये एकूण अकृषिक कर तहसील कार्यालयालयाला प्राप्त होणार आहे. सिडको नोडमधील अकृषिक करासंदर्भात रहिवाशांना नोटिसा पाठवून ६० दिवसांत हा कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित कालावधीत हा कर न भरल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.- बी. टी. गोसावी, नायब तहसीलदार अकृषिक कराला आमचा विरोध आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही दिले आहे. जागेचा मूळ मालक सिडको आहे. संबंधित जागेचा एनए सिडकोने केला असल्याने सिडकोकडून संबंधित कर वसूल होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात रहिवाशांना पत्र पाठवून संबंधित कर न भरण्याबाबत पत्र पाठवले आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार