शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : नाईक कुटुंबीय उतरणार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:56 IST

माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई : माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपच्या उमेदवार असलेल्या मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात नाईक कुटुंबीय उतरणार का, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कायमस्वरूपी वाद राहिला आहे. राष्ट्रवादीत असतानाही दोघांनी नेहमीच ऐकमेकांचा दु:स्वास केला. विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. या निवडणुकीत अवघ्या दीड हजार मतांनी नाईक यांचा पराभव करीत त्या जायंट किलर ठरल्या.गणेश नाईक यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली होती; परंतु भाजपने त्यांचा पत्ता कट करीत पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली आहे. तर नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या घटनेला दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण प्राप्त झाले. नाईक यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत गणेश नाईक यांनी ऐरोलीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह स्वत: संदीप नाईक यांनी धरला. ऐरोलीतून संदीप यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचे निश्चित झाले. त्यानंतर नाईक यांना लगेच पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी गणेश नाईक आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.तत्पूर्वी नवी मुंबईतील भाजप एकसंघ आहे. त्यामुळे बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातील भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील. त्या दृष्टीने प्रचारावर भर दिला जाईल, असे संदीप नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संदीप नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांना दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची धुरा संभाळावी लागणार आहे. मंदा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरताना सागर नाईक उपस्थित होते. मंदा म्हात्रे यांच्या पुढील प्रचारात संदीप नाईक व संजीव नाईक सहभागी होतील का, याबाबत शहरवासीयांत उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबईbelapur-acबेलापूर