शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहिनी जुन्या मार्गानेच टाकावी

By admin | Updated: November 29, 2014 22:26 IST

शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यातील अनेक गावांतून शेतजमिनीतून जाणारी गॅस पाइपलाइन तालुक्यातील शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा,  अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे. 
रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइनसाठी यापूर्वी कर्जत तालुक्यातील पन्नास गावांतील शेतजमीन अधिग्रहित केली आहे. त्याच मार्गातून नव्याने टाकली जाणारी पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी केली आहे.                  उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून आलेल्या कच्च्या गॅसवर प्रक्रिया करण्यासाठी कच्चे ऑइल उरण येथून चाकणमार्गे शिक्र ापूर येथे नेण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतक:यांचे नुकसान होणार आहे. कारण  कर्जत, खालापूर आणि पनवेल तालुक्यातून उरण अशी जात आहे. कर्जत तालुक्यातून बोर घाटातून ही पाइपलाइन पुढे पुणो जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तेथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्नणा एलपीजी कंपनीने उभी केली आहे. त्यासाठी उरण बंदरातून कच्चे तेल नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशाने जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम रायगड उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्जत तालुक्यात भिवपुरी कॅम्प, येथून कडावमार्गे राजनाला भागातून पुढे रेल्वे पट्टा अशी पुढे खालापूर आणि  पनवेल तालुक्यात जाणार आहे.(वार्ताहर)
 
च्पाइपलाइनसाठी दोनशे शेतक:यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे काम सुरू असून त्यासाठी शेतक:यांना अत्यल्प मोबदला दिला जात आहे.
च्कर्जत तालुक्यातील शेतक:यांचे नुकसान करणा:या या पाइपलाइनसाठी आमची जमीन मिळणार नाही, अशी भूमिका कर्जत तालुक्यातील शेतक:यांनी घेतली आहे.