शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईक करणार म्हात्रेंचा प्रचार, समर्थकांत प्रचंड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 06:38 IST

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश ...

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारले आहे. या मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे नाईक यांच्या समर्थकांत कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपने दगा दिल्याचे सूर नाईक समर्थकांतून आळवले जात आहेत.गणेश नाईक यांनी ११ सप्टेंबर रोजी पालिकेतील ५२ नगरसेवकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते.मंगळवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु नाईक स्वत: इच्छुक असलेल्या बेलापूरमधून पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता; परंतु नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याने युतीचा धर्म पाळण्याचे आदेश सेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नवी मुंबईतील शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले आहेत. बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र, बेलापूरमधून नाईक यांनाच डच्चू मिळाल्याने सेनेतील बंड थंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत नाईक काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.उरणमध्ये युतीबाबत संभ्रमउरण विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी (अपक्ष), उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा (अपक्ष), संतोष मधुकर पाटील (बसपा) यांचे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरणची जागा शिवसेनेसाठी ठेवली होती. मात्र येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस बालदी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत संभ्रम आहे.गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली होती.नाईक स्वत: इच्छुक असलेल्या बेलापूरमधून मात्र पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.विजय नाहटांची भूमिका अस्पष्टबेलापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार अद्यापि निश्चित झालेला नाही. बेलापूरची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने मागील चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा काय भूमिका घेतात, हे ४ आॅक्टोबरनंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईक