शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जकात नाक्याजवळ उभारा बस टर्मिनस : मंदा म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:18 IST

वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

नवी मुंबई : वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे महामार्गावर उभ्या असणाºया बसेसना चाप बसेल आणि मोकळ्या जागेवरील संभाव्य अतिक्रमणाला आळा घालता येईल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारने कर आकारणीच्या सुधारित धोरणाचा अवलंब केल्यानंतर राज्यातील सर्व जकात नाके बंद करण्यात आले आहे. नवी मुंबई व मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला वाशी जकात नाकाही बंद झाला आहे. त्यामुळे जकात नाक्याची जवळपास चार एक जागा रिकामी झाली आहे. ही मोकळी जागा वेळीच संरक्षित न केल्यास त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. सायन-पनवेल महामार्गावरून खासगी प्रवासी बसेससह विविध राज्यातील बसेसच्या दररोज शेकडो फेºया होतात. या बसेसना निश्चित थांबे नसल्याने महामार्गावरच प्रवाशांना उतरविले जाते व नवीन प्रवासी घेतले जातात. विशेषत: संध्याकाळच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात या बसेस उभ्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या झालेल्या भूखंडांवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारल्यास मुंबई, नवी मुंबईसह परराज्यातून येणाºया प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच या भूखंडांवरील संभाव्य अतिक्रमण टाळता येईल, अशी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी आहे.