शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 16:07 IST

नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार,

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर बुधवारी राजकीय घडामोडीला वेग आला होता. पुढील दिशा ठरविण्यासाठी सकाळी नाईक समर्थक नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर, गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून नाईक यांना एबी फॉर्मही देण्यात आली. कोकण विभागीय संघटन मंत्री सतीश धोंडे यांनी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत नाईक यांना AB फॉर्म दिला. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते.

नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्याने ऐरोलीतून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील, हे निश्चित झाले.दरम्यान, यासंदर्भात संदीप नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, ऐरोली आणि बेलापूरमधून भाजपाचे उमेदवार बहुमताने निवडूण येतील, असे स्पष्ट केले. तथापी संध्याकाळपर्यंत सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचक विधान करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

वडिलांसाठी मुलाची माघार

ऐरोली मतदार संघात भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली तर बेलापूर मधून गणेश नाईक यांच्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, गणेश नाईक यांच्यासाठी त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी स्वतः माघार घेतली. निवडणुकीसाठी गणेश नाईक यांचे नाव पुढे येत असल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाने गणेश नाईक ऐरोलीतून निवडणुकीत उभे राहणार आहेत, असेही संदीप यांनी म्हटले. त्यामुळे वडिलांसाठी पुत्राने आपल्या राजकीय करिअरचा त्याग केल्याचं दिसून येतंय. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईकMumbaiमुंबईBJPभाजपाairoli-acएरोलीbelapur-acबेलापूर