शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

एकीला लुटून दुसरीचा भरायचा हप्ता! इस्रोचा शास्त्रज्ञ बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, जुना इतिहास समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:20 IST

नवी मुंबई पोलिसांनी उच्च शिक्षित तरुणींना लुटणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे.

Navi Mumbai Crime: स्वतःला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी भासवून उच्चशिक्षित महिलांची फसवणूक करणाऱ्या एका ३४ वर्षीय भामट्याला नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली. आदर्श प्रशांत म्हात्रे असे या आरोपीचे नाव असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवून किमान सहा महिलांना तब्बल ८९.४० लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

बनावट ओळखपत्र आणि आलिशान जीवनशैली

अलिबागचा रहिवासी असलेला आदर्श म्हात्रे Shaadi.com, Bharat Matrimony आणि Jeevansathi.com सारख्या प्रसिद्ध मॅट्रिमोनिअल साईट्सवर सक्रिय होता. स्वतःची विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्याने इस्रो आणि पीडब्ल्यूडीची बनावट ओळखपत्रे तयार केली होती. पाचतारांकित हॉटेल्समधील मुक्काम आणि आलिशान जीवनशैलीचे फोटो अपलोड करून तो डॉक्टर आणि इंजिनिअर सारख्या उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

फसवणुकीची अजब पद्धत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रे महिलांशी जवळीक साधून लग्नाचे स्वप्न दाखवायचा. त्यानंतर, आपल्या घरासाठी किंवा चांगल्या प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी प्री-अप्रूव्ड वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी तो महिलांवर दबाव टाकायचा. कर्जाची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्यानंतर तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा आणि त्यानंतर अचानक गायब व्हायचा.

एका पीडितेकडून घेतलेल्या पैशातून तो दुसऱ्या पीडितेच्या कर्जाचा हप्ता भरायचा, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये आणि त्याला आपला गोरखधंदा सुरू ठेवता यावा. लुटलेल्या पैशांचा वापर तो गोव्यातील कॅसिनो आणि मौजमजेसाठी करत असे.

गुन्हेगारी इतिहास आणि अटक

ऑगस्ट २०२५ मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीनंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाअंती पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी म्हात्रेला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पुणे येथे त्याच्याविरुद्ध किमान ६ गुन्हे दाखल आहेत. म्हात्रेवर २०१९ पासून फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विनयभंगाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसisroइस्रो