शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:32 IST

महानगरपालिकेचे सुधारित पार्किंग धोरण रखडले आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेचे सुधारित पार्किंग धोरण रखडले आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या २२ ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपआयुक्तांनी १०५ ठिकाणी नो पार्किंग झोन केला आहे. ५२ ठिकाणी सम-विषम पार्किंग व ४२ ठिकाणी समांतर पार्किंगसाठी जागा अधिसूचित केल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये सिडकोकडून १४ वाहनतळासाठी व ४३ ठिकाणी रिक्षा व टॅक्सी स्टँडकरिता भूखंड हस्तांतरित करून दिले आहेत. महानगरपालिकेनेही सुधारित पार्किंग धोरण तयार करण्यास सुरवात केली आहे. शहरात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंत्यांकडून सुक्ष्म नियोजन करून पार्किंग आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे धोरण तयार करण्यास अजून काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामुळे २२ ठिकाणचे वाहनतळ चालविण्यासाठी विद्यमान ठेकेदारांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.महानगरपालिकेने शहरातील तब्बल ४५ ठिकाणी पे अँड पार्क योजना सुरू करण्यासाठी जाहिरात दिली आहे. परंतु यामधील अनेक ठिकाणच्या जागांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ होत आहे. नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत जुन्याच ठेकेदारांना नियुक्त केले जाणार आहे. पूर्वीच्याच दराने त्यांच्याकडून भाडे घेतले जाणार आहे.>नियमांची अंमलबजावणी नाहीमहानगरपालिकेने २०१२ पासून शहरात पे अँड पार्क योजना सुरू केली आहे. यासाठी सद्यस्थितीमध्ये २२ ठेकेदार नियुक्त केले आहेत. वास्तविक ठेकेदारांनी त्यांना निश्चित केलेल्या जागांवर बोर्ड लावणे आवश्यक आहे. त्यांना निश्चित करून दिलेल्या विभागाचा तपशील, शुल्क आकारणीचे दरही त्यावर लिहिणे बंधनकारक आहे. कार व दुचाकी पार्किंगसाठीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु निविदेमधील अटी व शर्तीचे उल्लंघन होत असून त्यावर प्रशासनही दुर्लक्ष करत आहेत. महासभेमध्येही या विषयावर फारशी चर्चा झाली नाही.

टॅग्स :Parkingपार्किंग