शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रुग्णालयात गॅसपाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा, वाशीत ४८३ ऑक्सिजन बेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:40 IST

नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,१८३ बेड्स क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामध्ये ४८३ आॅक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामधील रुग्णालयामध्ये बुधवारपासून गॅसपाइपलाइनद्वारे आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ४८३ बेडला ही यंत्रणा बसविली जाणार असून, तेथे ७५ आयसीयू युनिटही सुरू केली जाणार आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,१८३ बेड्स क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामध्ये ४८३ आॅक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून आॅक्सिजन सिलिंडरद्वारे पुरवठा केला जात होता. मात्र, यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा, या ठिकाणी आॅक्सिजन पुरवठ्यासाठी पाइपलाइन बसविण्यात आली आहे. त्यासाठी लिक्विड आॅक्सिजन प्लान्ट उभारला आहे. त्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असून, आज आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या सर्व कामांची पाहणी केली. बुधवारपासून हा आॅक्सिजन प्लांट कार्यान्वित होऊन याद्वारे रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ७५ आयसीयू बेड्सची व्यवस्था के ली आहे, सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयातही ७५ आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी कामांची पाहणी केली. साधारणत: १० ते १५ दिवसांमध्ये १५0 आयसीयू बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध होतील, असे आयुक्तांनी सांगितले.रुग्णांशी नवी मुंबई पालिका आयुक्तांनी साधला संवादसिडको एक्झिबिशन सेंटर पाहणी दौऱ्याप्रसंगी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पब्लिक अ‍ॅड्रस सीस्टिमवरून रुग्णांशी थेट सुसंवाद साधला.यामध्ये त्यांनी त्या ठिकाणची आरोग्य तपासणी, तसेच देण्यात येणाºया जेवण आणि इतर सुविधांबाबत रुग्णांना विचारणा केली,तेव्हा सर्व रुग्णांनी हात उंचावून, टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि महानगरपालिकेची व्यवस्था चांगली असल्याचे अभिप्राय व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल