'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:08 IST2026-02-04T16:07:25+5:302026-02-04T16:08:55+5:30
आज संसदेच्या आवारात राहुल गांधींनी बिट्टूंना 'गद्दार' म्हटल्याने मोठा वाद झाला.

'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप
नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, आज(दि.4) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात संसदेच्या आवारात तीव्र शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान राहुल गांधींनी बिट्टू यांना ‘गद्दार’ म्हटले, तर त्यावर प्रत्युत्तर देताना बिट्टू यांनी राहुल गांधींना ‘देशाचा शत्रू’ संबोधले. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप करण्यात आले असून, प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
झटापटीचा प्रयत्न केला...
Delhi: On a verbal altercation with Lok Sabha LoP Rahul Gandhi, Union MoS Ravneet Singh Bittu says, "Today, even a street goon would not do what Rahul Gandhi has done. When I did not shake hands, he was about to physically assault me..." pic.twitter.com/dQMkpUnmvX
— IANS (@ians_india) February 4, 2026
केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना आरोप केला की, राहुल गांधी त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओ पाहिलात तर दिसेल की, ते माझ्याकडे येत होते. वेणुगोपाल आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांनी त्यांना थांबवले.
बिट्टू पुढे म्हणाले, माझ्या डोक्यावर गुरुंची पगडी आहे. मी पंजाबचा आहे. मी कसा कुणासमोर झुकू शकतो? हात मिळवण्याची गोष्टच नाही. ते माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करत होते, पण इतर खासदारांनी त्यांना अडवले.
#WATCH | Delhi: As Union MoS Ravneet Singh Bittu passes by the protesting Congress MPs at Makar Dwar, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Here is a traitor walking right by. Look at the face..."
— ANI (@ANI) February 4, 2026
LoP Rahul Gandhi offered to shake his hands, saying, "Hello brother, my traitor… pic.twitter.com/5wMgjM8KAW
सभागृहातही तणाव; सभापतींचा हस्तक्षेप
बिट्टू यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद संसद भवनाच्या आतही सुरूच राहिला. मी सभागृहात जात असताना त्यांनी तिथेही अशीच वागणूक दिली. अखेर सभापतींनी त्यांना बाहेर पाठवले. बाहेरही त्यांनी रस्त्यावरील गुंडांसारखे वर्तन केले, असा आरोपही बिट्टू यांनी केला.
शीख समाजावर लक्ष्य केल्याचा आरोप
#WATCH | Union MoS Ravneet Singh Bittu says, "...He feels that he is the biggest patriot, that his father sacrificed himself. Congress party and Gandhi family had set Punjab on fire. Bullets were fired at our biggest Gurudwara, at Golden Temple. They targeted thousands of Sikhs,… https://t.co/GJVWo2oHRwpic.twitter.com/gOwVXy6g6r
— ANI (@ANI) February 4, 2026
रवनीत सिंह बिट्टू यांनी गांधी कुटुंबावर गंभीर आरोप करत म्हटले की, गांधी कुटुंबाने नेहमीच शीख समाज आणि पगडीधारी लोकांना लक्ष्य केले आहे. या वादादरम्यान इतर कोणत्याही खासदाराने हस्तक्षेप केला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
1984 च्या दंग्यांचा उल्लेख
बिट्टू यांनी राहुल गांधींवर थेट टीका करत म्हटले, तुम्ही देशातील सर्वात मोठे गद्दार आहात. तुम्ही शीखांचे मारेकरी आहात. तुमच्या गुंडांनी या देशात हजारो शीखांची हत्या केली. आमच्या सर्वात पवित्र गुरुद्वाऱ्यात तोडफोड केली, असेही बिट्टू म्हणाले.