तो हा नव्हेच, व्हॉट्स ऍपवर वेगळा फोटो होता; घटिका समीप आली असताना नवरीनं लग्न मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 08:44 AM2021-03-07T08:44:50+5:302021-03-07T08:46:49+5:30

शेवटच्या क्षणी मुलीनं लग्न मोडलं; दोन्ही कुटुंबात जुंपली

Woman backs out of marriage after seeing groom says picture of man sent on WhatsApp was different | तो हा नव्हेच, व्हॉट्स ऍपवर वेगळा फोटो होता; घटिका समीप आली असताना नवरीनं लग्न मोडलं

तो हा नव्हेच, व्हॉट्स ऍपवर वेगळा फोटो होता; घटिका समीप आली असताना नवरीनं लग्न मोडलं

googlenewsNext

लग्न मंडप सजलेला, पाहुणे मंडळी जमलेली, मुहूर्ताची घटिका समीप आलेली.. थोड्याच वेळात दोन जीव एकत्र येणार होते. आयुष्यभराचे बंध जुळणार होते. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण.. नवरा-नवरी समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि लग्न मोडलं.. चक्रावून टाकणारी ही घटना बिहारमधल्या पश्चिम चंपारण्या जिल्ह्यातल्या बेतिहमध्य घडली आहे. लग्नात नवरीनं नवरदेवाला पाहताच लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

थरारक! फॅन नसतानाही बाथरूमधून यायची हवा; तरूणीनं आतला आरसा बाजूला सरकवताच समोर आलं असं काही....

लग्न जमण्याआधी मुलगा-मुलगी एकमेकांना भेटतात. मात्र या लग्नात तसं काही घडलं नव्हतं. दोघांनाही कुटुंबांनी एकमेकांचे फोटो व्हॉट्स ऍपवर पाठवले होते. दोघांनी होकार दिल्यानंतर लग्न ठरलं. विवाहाचा दिवस उजाडला. दोघेही एकमेकांसमोर आले. त्यावेळी 'मला व्हॉट्स ऍपवर पाठवण्यात आलेला फोटो वेगळा होता आणि आता समोर असलेला मुलगा वेगळा आहे,' असा दावा केला. यामुळे मांडवात असलेले सारेच चक्रावून गेले.

प्रसिद्धीसाठी युवकानं मानेवर 'QR Code' टॅटू काढला; पण नंतर जो काही प्रताप घडला, तो ऐकून...

तो हा नव्हेच म्हणत तरुणी लग्न मंडपातून निघून गेली. त्यामुळे मुलाकडच्या मंडळींना मुलीशिवाय घरी परतावं लागलं. मुलीनं अखेरच्या क्षणी लग्न मोडल्यानं साऱ्यांनाच धक्का बसला. यानंतर मुलाकडच्या मंडळींनी संताप व्यक्त केला. मुलीची मोठी बहिण तिला लग्न मंडपातून घेऊन गेल्यानं सगळेच भडकले. मुलीला मुलगा पसंत नसल्यानं तिनं लग्न करण्यास नकार दिल्याचं मुलीच्या वडिलांनी मुलाकडच्या मंडळींना सांगितलं.

सुखी, आनंदी संसाराची स्वप्नं पाहत असताना अचानक नवरी मांडवातून निघून गेल्यानं वराला धक्का बसला. त्याच्या वडिलांनी लग्नाची संपूर्ण तयारी केली होती. लग्नासाठी अनेक नातेवाईक दूरवरून आले होते. पण मुलीनं शेवटच्या क्षणी लग्न मोडल्यानं सगळेच निराश झाले. स्थानिकांनी मुलाकडच्यांची समजूत काढली. त्यानंतर ते पुन्हा माघारी परतण्यास तयार झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूंपैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

Web Title: Woman backs out of marriage after seeing groom says picture of man sent on WhatsApp was different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न