New york woman made stunning discovery found an entire apartment behind her bathroom mirror see viral video | थरारक! फॅन नसतानाही बाथरूमधून यायची हवा; तरूणीनं आतला आरसा बाजूला सरकवताच समोर आलं असं काही....

थरारक! फॅन नसतानाही बाथरूमधून यायची हवा; तरूणीनं आतला आरसा बाजूला सरकवताच समोर आलं असं काही....

कधी कधी घरात अशा गोष्टी सापडतात, ज्याचा आपण कधीही विचारही केलेला नसतो. न्यूयॉर्क शहरातील एका महिलेने आपल्या घरामध्ये एक आश्चर्यकारक शोध लावला आहे.  आपल्या घरातील बाथरूमच्या आरश्यामागे एक संपूर्ण इमारत तिला दिसली. सीएनएनच्या वृत्तानुसार, सामंथा हार्टसो या महिलेनं आपल्या शोधाचे फोटो सोशल  मीडियावर शेअर केले आहेत. 

हा व्हिडिओ टिकटॉकवर 7 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये तिने सांगितले की वारा इतका जोरात होता की तिचे केस उडायला सुरूवात झाली. सिंकच्या वरच्या आरशातून जोरदार वारा वाहत होता. आरसा बाजूला सरकवल्यानंतर असं काही दिसलं त्यामुळे झोपंच उडाली.  आरसा काढताच त्याच्या मागे एक मोठा छिद्र दिसले आणि तेथून  संपूर्ण खोली दिसली.

या व्हिडीओमध्ये त्या सांगतात की,'' मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बाथरूमच्या पलिकडे काय आहे. हे मला माहित करून घ्यायचं आहे.'' त्यानंतर त्यांनी मास्क लावला आणि ग्लोव्हज घातले. हातात हथोडी घेतली आणि पुढे गेल्या.  त्यानंतर त्यांना पूर्ण अपार्टमेंट दिसून आली.  या संपूर्ण घटनेचे फुटेज व्हायरल झाले असून या खोलीत कचरा आणि पिशव्या भरलेल्या तुम्हाला दिसून येतील. याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ

हार्टसोनं दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पाण्याचा बाटल्या होत्या. त्याठिकाणी कोणीतरी असू शकतं असं त्यांना वाटतं. त्याने पुढे स्पष्ट केले की घर खरोखर जुने आहे आणि स्नानगृह क्षेत्रात फिटिंग किंवा वास्तविक शौचालय नाही, परंतु फक्त पाइपिंग आहे. अनपेक्षितरित्या, या शोधानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हार्टसोचा व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा पोस्ट केला गेला आणि 4 दशलक्षाहूनही जास्त वेळा पाहिला गेला आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New york woman made stunning discovery found an entire apartment behind her bathroom mirror see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.