Man made a rope made of old saree piece stuck in a machine and in minutes made a rope see video | याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ

याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ

लोक जुन्या साडीचा वाापर करून काय काय बनवू शकतात हे काही वेगळं सांगायला नको. नवनवीन कुर्ते, फेट्यांपासून पार गोधड्यांपर्यंत नवनवीन गोष्टी साडीपासून तयार करता येऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका माणसानं  जुन्या साडीचा वापर करून काही मिनिटात दोरी बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ लेखक अद्वैत कला यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारत आपल्या नाविन्यपूर्ण - आणि ''what" या भावनेने मला आश्चर्यचकित करण्यास कधीही अपयशी ठरत नाही! जुन्या साडीतून दोरी कशी बनवायची हे पाहा. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की या लोकांनी साडीचे बरेच लांब तुकडे केले आहेत. त्यानंतर तो दुचाकीवरील मशीनमध्ये अडकवला. मग आपण एक माणूस मशीन हँडल चालवतो आणि काही मिनिटांत एक मजबूत दोरखंड कसा तयार करतो. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत ३१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. १ मिनिटं ५३ सेकेदांच्या या व्हिडीओनं लोकांना वेड लावलं आहे. कारण आपण पाहतो घरोघरी कपडे वाळत घालण्यासाठी अशाच दोऱ्यांचा वापर केला जातो. जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man made a rope made of old saree piece stuck in a machine and in minutes made a rope see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.