Man climbs electric pole after wife leaves house without informing him in Chhattisgarh | बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

''शोले' सिनेमातील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरील सीन अनेकजण रिअल लाइफमध्येही रिक्रिएट करतात. शोलेतील वीरू बसंतीसोबत लग्न करण्याची जिद्द पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता. पण एका पती आपल्या पत्नीसाठी विजेच्या खांबावर चढल्याचे ऐकले का? नाही ना? मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नी काहीच न सांगता घरातून निघून गेली होती म्हणून दुखात पती विजेच्या खांबावर चढला.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, ही घटना छत्तीसगढच्या बलरामपूरमधील आहे. इथे एक पती विजेच्या खांबावर चढला तर त्याला बघून लोक घाबरले. आधी तर लोकांनी त्याला खाली उतरण्यासाठी खूप समजावलं. पण जेव्हा त्याने ऐकलं नाही तर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी खूप समजावल्यावर तो खाली उतरला.

ही घटना गुरूवारची आहे. पोलिसांनुसार, ही व्यक्ती नशेत होती आणि त्याची पत्नी त्याला न सांगता कुठे निघून गेली होती. या गोष्टीने परेशान दु:खी होऊन तो विजेच्या खांबावर चढला. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांनी त्याला मोठ्या मेहनतीने खाली उतरवलं आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत त्याची नशा उतरली होती. त्याला नंतर समजावून घरी पाठवण्यात आलं. 
 

Web Title: Man climbs electric pole after wife leaves house without informing him in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.