शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:27 IST

त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. 

हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात सुमारे २५ लाख बनावट मतदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. 

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी उल्लेख केलेले घर पलवल जिल्ह्यातील होडल विधानसभा मतदारसंघातील गुदराना गावात आहे. हे घर सुमारे एक एकर परिसरात बांधण्यात आले आहे. त्यात राहणारे उमेश हे भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. उमेश यांनी म्हटले, आपल्या विस्तारित कुटुंबात सुमारे १५० मतदार आहेत. आजोबांचे चार भाऊ होते. यानंतर वडलांचे 9 भाऊ झाले. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबात 200 सदस्य आहेत. यामुळे सर्वांची मतदार नोंद एकाच पत्त्यावर असणे स्वाभाविक आहे.

दुसरीकडे गुदरानाच्या बीएलओने म्हटले आहे की, नव्या मतदार नोंदीत जुन्या घराचा क्रमांक चुकून वापरला गेला आहे. राहुल गांधींनी ज्या दुसऱ्या घराचा होडलमधील घर क्रमांक २६५ चा उल्लेख केला होता, त्यात ५०१ मतदार असल्याचा दावा केला होता. मात्र तो क्रमांकच सापडला नाही. 

काय म्हणाले होते राहुल गांधी ?  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हरियाणातील निवडणुकीसंदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, राज्यातील प्रत्येक आठवे मत बनावट आहे आणि तब्बल २५ लाख मतदार बनावट आहेत. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, १,२४,१७७ मतदारांची छायाचित्रे एकसारखी असून तीच छायाचित्रे अनेक वेळा वापरण्यात आली आहेत. एवढेच नाही तर, या गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV फूटेजदेखील नष्ट करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's claim of fake voters in Haryana: The truth.

Web Summary : Rahul Gandhi alleged 2.5 million fake voters in Haryana, citing a BJP leader's address with 66 voters. The leader clarified it's a large family. Officials cited errors in voter roll updates, disputing Gandhi's claims.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHaryanaहरयाणाcongressकाँग्रेसBJPभाजपा