शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee : "देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर..."; ममता बॅनर्जी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:39 IST

Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पश्चिम बर्धमान येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली. भाजपाची कोणतीही रणनीती आपल्याला लढण्यापासून रोखू शकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "ते पुन्हा लॉकडाऊन लावून लोकांना घरांमध्ये कैद करू शकतात. २०२१ मध्येही आम्ही लॉकडाऊनच्या काळात निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मी कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी तयार आहे." तसेच एलपीजी सिलिंडरची टंचाई आणि वाढत्या किमतींबाबतही चिंता व्यक्त केली. 

सिलिंडर आता १,१०० रुपयांवर

पूर्वी ४०० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १,१०० रुपयांवर पोहोचला आहे. सिलिंडर बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यासाठी २५-३५ दिवस लागत असल्याच्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यामुळे लोकांना पुन्हा स्वयंपाकाच्या जुन्या पद्धतींकडे वळण्यास भाग पाडलं जात असल्याचं देखील ममता म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी 'SIR' प्रक्रियेद्वारे मतदारांची नावं वगळण्यावरून भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला. त्यांनी भाजपाचा उल्लेख 'वॉशिंग मशीन' असा केला आणि आरोप केला की, यातून खऱ्या मतदारांची (हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, एससी/एसटी) नावं हटवली जात आहेत. ज्यांची नावं हटवण्यात आली आहेत, त्यांना ट्रिब्यूनलमध्ये लढण्यासाठी तृणमूल काँग्रेस मोफत कायदेशीर मदत देईल आणि प्रत्येक भागात कॅम्प लावून मदत करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

"भाजपा सरकार ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पडेल"

केंद्रातील भाजपा सरकार या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पडेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाचे एजंट म्हणून काम करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीविरोधात समर्थकांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee fears lockdown, slams LPG price hike, BJP collusion.

Web Summary : Mamata Banerjee anticipates a potential lockdown and criticizes rising LPG prices, now ₹1,100. She accuses BJP and Election Commission of voter list manipulation, promising legal aid. Banerjee predicts the BJP government will fall by September.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल