शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 3:29 PM

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात उघडली मोहिमकाँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेवरून सरकारवर केली टीकामायावती म्हणाल्या, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता कामा नये

लखनौ - तीन जुलै रोजी झालेल्या चकमकीत आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काऊंटर केला होता. दरम्यान, या एन्काऊंटरवर विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच आता विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. तर काही जण फेसबूकवरूनच योगी सरकार पाडण्याची धमकी देत आहेत. दरम्यान, काँग्रेससारख्या पक्षाला सुद्धा आता विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून खेळल्या जात असलेल्या ब्राह्मण कार्डामध्ये राजकीय संधी दिसू लागली आहे.   

उत्तर प्रदेशमधील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोहिम उघडली आहे. यात एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘तुम कार पलटो हम सरकार पलटाएंगे’. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, श्रीप्रकाश शुक्ला याच्या एन्काऊंटरनंतर कल्याण सिंह पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. म्हटलं आठवण करून देऊ. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले आहे की, परशुरामाचा वंशज आहे पुन्हा कधीच ठाकूर समाजाच्या व्यक्तीला मत देणार नाही.दरम्यान, विकास दुबेची पत्नी आणि  मुलाचा फोटोही सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच काँग्रेसचे काही नेते २२ वर्षांच्या अमर दुबेचे एन्काऊंटर आणि त्याच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेला मुद्दा बनवत आहेत. काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेवरून सरकारवर टीका केली आहे.

 बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली असून, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता कामा नये. सरकारने कुठलेही असे काम करू नये ज्यामुळे ब्राम्हण समाज भयभीत होईल, असे मत मांडले आहे. मायावतींच्या या टीकेला काँग्रेस नेते नेते जितीन प्रसाद यांनीही समर्थन दिले आहेत. तसेच ब्राह्मण समाजाच्यावतीने त्यांचे आभारही मानले आहेत.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसmayawatiमायावती