शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाचे दस्तावेज डिजिटल लॉकरमध्ये

By admin | Updated: September 8, 2016 05:21 IST

वाहन चालवणाऱ्यांना यापुढे परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी बुक) सोबत बाळगण्याची गरज नाही.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीवाहन चालवणाऱ्यांना यापुढे परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी बुक) सोबत बाळगण्याची गरज नाही. सरकारच्या डिजिलॉकरमुळे ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी या सेवेचे उद्घाटन केले. उत्तम कनेक्टिव्हीटी असल्यामुळे सर्वप्रथम ही सोय दिल्ली व तेलंगणात सुरू होईल. सध्या पोलीस इथे ई-चलान प्रयोगाचा अवलंब करीत आहेत.रस्ता व महामार्ग विभागाचे संचालक प्रियंक भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या आरसीचे स्पॉट व्हेरिफिकेशन मोबाईलच्या स्मार्ट फोनवर करता येणार आहे. वाहतूक पोलीस अथवा अधिकारी एका अ‍ॅपद्वारे या दस्तऐवजांची सत्यता पडताळून पाहू शकतील. त्यात काही विपरित आढळल्यास या अ‍ॅपवरच दंडाची रक्कमही भरता येईल.इंटरनेट बँकिंगसाठी सर्व बँका ज्या सुरक्षा व्यवस्थेचा वापर करतात, तीच व्यवस्था डिजिटल लॉकरसाठी वापरण्यात येणार आहे. खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरमार्फत, उदाहरणार्थ गुगलवर स्टोअर केलेल्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेची खात्री देता येत नाही तथापि सरकारतर्फे उपलब्ध होणारे डिजिटल लॉकर २४ तास १00 टक्के सुरक्षित असेल. कारण डिजिटल लॉकरचा डेटा सर्व्हर सरकारी नियंत्रणात असेल. डिजिटल लॉकरमधे नोंदवलेली सारी माहिती व दस्तऐवज क्लाउड माध्यमावर सेव्ह केले जातील. ही माहिती सरकारलाही उपलब्ध होणार असल्याने कुठेही त्याच्या सत्यतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही अथवा अ‍ॅटेस्टेशन करावे लागणार नाही. डिजिटल लॉकरमधील डेटाची छेडछाड करणाऱ्यावर माहिती तंत्रज्ञानाच्या सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल. 21.51 लाख लोकांनी डिजिलॉकरसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. 24.91 लाख दस्तऐवज आतापर्यंत या लॉकरवर अपलोड करण्यात आले आहेत.असा असेल डिजिटल लॉकर; सर्वच दस्तावेज असतील त्यावर प्रत्येक भारतीयाला स्वत:चा डिजिटल लॉकर आपल्या स्मार्ट फोनवर अथवा इंटरनेटवर उघडता येईल. त्याची नोंदणी करताना आधार कार्ड नंबर टाईप केल्यावर मोबाईल वा मेलवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो एंटर करून साईनअप केल्यावर डिजिटल लॉकरचा युजर आयडी व पासवर्ड तयार करता येईल. स्मार्ट फोन उपलब्ध नसणाऱ्यांना आपल्या हाताच्या बोटांच्या ठशांचा वापर करूनही युजर आयडी व पासवर्ड तयार करता येईल. केवळ ड्रायव्हिंग लायसन्स व आरसी बुकच नव्हे, तर पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्डासह स्वत:चे शैक्षणिक, वैद्यकीय, स्थावर मिळकतीचे दस्तऐवज व अन्य महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षितरित्या स्टोअर करण्याची सोय मोबाईल अथवा इंटरनेटद्वारे डिजिटल लॉकरमध्ये आहे. डिजिटल लॉकरमधे दस्तऐवज अपलोड केल्यानंतर कुठेही त्याच्या सत्यतेचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता भासणार नाही. आगामी काळात सरकारही प्रत्येक व्यक्तीशी संबंधित सारे दस्तऐवज रेकार्डसाठी त्याच्या डिजिटल लॉकरमध्येच अपलोड करणार आहे. डिजिटल लॉकरची स्टोअरेज क्षमता मोठी आहे. त्यावर ढऊऋ, खढएॠ, ढठॠ, ॠकऋ यापैकी कोणत्याही फॉर्ममधे डेटा सेव्ह करता येईल. १0 टइ साईजची फाईल 1 टइ होऊ शकते. डिजिटल लॉकरसाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही. तसेच सर्व ठिकाणी ग्राह्ण व सुरक्षित असलेली ही सुविधा लिंक बेस्ड असल्याने कोणताही दस्तऐवज हरवण्याची भीती नाही. जिथे गरज असेल, तिथे त्यातील आवश्यक डेटा शेअर करता येईल.