शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:23 IST

Vande Bharat Sleeper Train News: १८० च्या स्पीडने जातानाही वंदे भारत ट्रेन एवढी स्टेबल होती की, लोको पायलटच्या केबिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातील एकही थेंब पाणी सांडले नाही. व्हिडिओ पाहाच...

Vande Bharat Sleeper Train News:भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम, वेगवान, लोकप्रिय आणि हायस्पीड ट्रेन म्हणजे वंदे भारत. वंदे भारत ट्रेनच्या देशभरातील मार्गावर सेवा सुरू आहेत. यातच अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ केली जात आहे. यातच वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन कधी येणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच वंदे भारत स्लीपर ट्रेनची एक चाचणी घेण्यात आली असून, या ट्रेनने १८० प्रति तास हा वेग सहज गाठला. वंदे भारत स्लीपर ट्रेनची कामगिरी इतकी आरामात झाली की, केबिनमध्ये ठेवलेल्या ग्लासमधील एक थेंबही पाणी सांडले नाही. या चाचणीचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे. 

काही महिन्यांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेनची देशभरात चाचणी घेण्यात आली. प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सज्ज झाली आहे. यातच वंदे भारत स्लीपर ट्रेनचे आणखी एक नवे डिझाइन समोर आले. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल, असा कयास बांधला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर ट्रेनमध्ये आरामदायी व्यवस्था असेल. जेव्हा ट्रेन प्रत्यक्षात धावेल, तेव्हा ती किती किती स्थिर असेल? याची चाचणी घेण्यात आली. सवाई माधोपूर-कोटा-नागदा विभागात एक चाचणी घेण्यात आली. लोको पायलटच्या केबिनमधून एक व्हिडिओ काढण्यात आला. 

वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू असताना, लोको पायलटच्या केबिनमधील एक कर्मचारी चित्रीकरण करत होते. केबिनमधील स्पीडोमीटरच्या अगदी समोर पाण्याचे तीन ग्लास ठेवले आहे. तथापि, ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने जात असतानाही, या ग्लासमधील पाण्याचा एक थेंबही सांडला नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या स्पीडोमीटरमध्ये ०-२०० चा वेग दिसत आहे.  व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान वंदे भारत ट्रेनचा स्पीड १८० किमी प्रतितास गेल्याचे पाहायला मिळत आहे. अंदाजे २७ सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या या व्हिडिओवर अनेक युझर्स व्यक्त होत आहेत. एकाने पोस्टवर टिप्पणी केली, ही एक मोठी उपलब्धी आहे. अभिनंदन. तरीही, कृपया प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे बारकाईने लक्ष द्या. दुसऱ्याने म्हटले की, ग्लासमधील पाणी सांडले नाही हे पाहून आनंद झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Sleeper Train Hits 180 kmph, Sets New Record

Web Summary : Vande Bharat sleeper train trials achieved 180 kmph. Water remained undisturbed, showcasing stability. Sleeper version expected soon, prioritizing passenger comfort and safety. A test run video went viral.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीSocial Viralसोशल व्हायरल