शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश पोलिसांचा पराक्रम; चोरीच्या प्रकरणात आरोपीऐवजी न्यायाधिशाचा शोध केला सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:39 IST

उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायाधिशाला चोर समजून कारवाई केल्याची घटना समोर आली आहे.

UP Police:उत्तर प्रदेशपोलिसांच्या एका हास्यास्पद कामगिरीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशातपोलिसांनी एका आरोपीला अटक करण्याऐवजी चक्क महिला न्यायाधिशाला ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरु केली होती. काही वेळासाठी महिला न्यायाधिशाला हा सगळा प्रकार बघून धक्काच बसला होता. मात्र त्यानंतर महिला न्यायाधिशाने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पोलीस अधिकाऱ्याने चोरीच्या आरोपींना शोधण्याऐवजी थेट न्यायालयाच्या न्यायाधीशांना आरोपी बनवले. बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, न्यायालयाने चोरीचा आरोपी राजकुमार उर्फ ​​पप्पूविरुद्ध सीआरपीसीच्या कलम ८२ अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी करुन न्यायालयात हजर राहण्यासाठी निर्देश दिले होते. मात्र संबधित अधिकाऱ्याने आपलं डोकं वापरुन हा आदेश जारी करणाऱ्या महिला न्यायाधिशालाच आरोपी बनवले.

उपनिरीक्षक बनवारीलाल या अधिकाऱ्याने अजामीनपात्र वॉरंट घेऊन न्यायाधीश नगमा खान यांचा शोध सुरु केला. २३ मार्च रोजी जेव्हा हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला तेव्हा हा धक्कादायक खुलासा झाला. पोलीस अधिकाऱ्याने अहवालात 'आरोपी नगमा खान तिच्या घरी आढळली नाही, कृपया पुढील कारवाई करा, असे लिहीले होते. न्यायालयाने या निष्काळजीपणाला गांभीर्याने घेतले. अहवालात आरोपीच्या जागी न्यायाधीशाचे नाव पाहिल्यानंतर न्यायाधीश नगमा खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) नगमा खान पोलिसांवर चांगल्याच संतापल्या. पोलिसांच्या या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले."ज्या अधिकाऱ्याला कारवाई करायची होती त्याला ना प्रक्रिया समजते आणि ना आदेश कोणाविरुद्ध आहे हे माहित आहे. हा कर्तव्यातील स्पष्ट निष्काळजीपणा आहे," असे नगमा खान यांनी म्हटले. नगमा खान यांनीनी पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आग्रा रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली. आता या प्रकरणाची सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी