शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचे CM हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा; आता या मुलींनाही वर्षाला मिळणार १२ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:52 IST

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा.

Mukhyamantri Maiya Samman Yojana : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी एक मोठी घोषणा करताना युवतींना मोठी खुशखबर दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, आता १८ ते २० वयोगटातील मुलींनाही मुख्यमंत्री मैया सम्मान (JMMSY Mukhyamantri Maiya Samman Yojana) योजनेत सामाविष्ट केले जाईल. या सर्व भगिनींचे फॉर्म शासन तुमच्या दारी या कार्यक्रमात भरले जातील आणि कायदा होताच त्या लाखो मुलींच्या खात्यात मानधनही जमा होईल, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. नुकत्याच सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत २१ ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात होता. या योजनेअंतर्गत या महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळतात. 

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन या योजनेचा सतत प्रचार करत आहेत. त्यांची नजर महिला मतदारांवर आहे. एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना हेमंत सोरेन म्हणाले की, अवघ्या २०-२५ दिवसांत सुमारे ५० लाख भगिनी या योजनेशी जोडल्या जात आहेत आणि त्यांना कोट्यवधी रुपयांच्या मानधनाची रक्कम दिली जात आहे. अन्न, वस्त्र, घर या सर्व गरजा प्रत्येक गरीब आणि श्रीमंताला लागतात. 'सोना सोबरण' या योजनेंतर्गत आम्ही लाखो गरीबांना वर्षातून दोनदा धोतर-लुंगी आणि साडी देखील देत ​​आहोत. गरीब जनतेला सन्मान देण्याचे काम आम्ही केले आहे. 

हेमंत सोरेन पुढे म्हणाले की, मागील डबल इंजिन सरकारने ११ लाख शिधापत्रिका रद्द केल्या होत्या, आम्ही २० लाख नवीन शिधापत्रिका दिल्या. त्यातही राज्यातील जनतेशी भेदभाव करण्यात आला, आम्हाला सरकारी गोदामातून रेशन घेऊ दिले गेले नाही. पण आम्ही बाजारातून रेशन खरेदी करून लोकांना वाटले. इथे रोज विरोधक सरकार पाडण्यात आणि आमदार फोडण्यात मग्न असतात. त्यांना देशाची आणि राज्याची पर्वा नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडWomenमहिला