शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:33 IST

"देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती जेव्हा संघ अथवा हिंदूत्ववादी शक्तींना विरोध करतात, तेव्हा त्याच्या मागे काही तरी स्वार्थ असतो, छुपा अजेंडा असतो."

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याच्या मागणीवर, योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांचे विचार भारत आणि भारतीयतेशी मेळ खात नाहीत, तेच अशा पद्धतीचा अजेंडा चालवतात. त्यांना लढायचेच असल्यास तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी लढावे, पण त्यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून आरएसएसवर अभद्र टिप्पणी करतात,” असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

दिल्ली येथे एएनआयशी बोलताना रामदेव म्हणाले, “आरएसएस राजकीय पक्ष नाही. राजकीय विंग भाजप आहे. मी गेल्या दोन-तीन दशकांपासून आरएसएसला जवळून पाहिले आहे. संघात अत्यंत तपस्वी आणि देशभक्त लोक कार्यरत आहेत. डॉ. हेडगेवार आणि सदाशिवराव गोलवलकर यांसारख्या महान व्यक्तींनी त्यात आयुष्य झोकून दिले. आजही लाखो संघ कार्यकर्ते देशसेवेसाठी कार्यरत आहेत. देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती जेव्हा संघ अथवा हिंदूत्ववादी शक्तींना विरोध करतात, तेव्हा त्याच्या मागे काही तरी स्वार्थ असतो, छुपा अजेंडा असतो.

काय म्हणाले होते खर्गे? -दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, “जर मोदी खरंच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा सन्मान करत असतील, तर त्यांनी आरएसएसवर बंदी घालावी,” असे म्हटले होते.  एढेच नाही तर, “देशातील सर्व चुकांची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व समस्यांसाठी भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे,” असा आरोपही खर्गे यांनी केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमावेली काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर खर्गे यांनी हे विधान केले होते. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा योग्यरित्या पुढे न नेल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Ramdev slams Kharge's RSS ban demand, defends Sangh.

Web Summary : Baba Ramdev strongly criticized Kharge's call to ban RSS, calling it an agenda by those opposing Indian values. He defended RSS as patriotic, not political, with selfless workers. Kharge blamed BJP and RSS for problems, after Modi criticized Congress on Sardar Patel.
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ