शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा

By प्रसाद कुलकर्णी | Published: May 23, 2024 1:09 PM

पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

प्रसाद कुलकर्णी -

भगवान जगन्नाथ यांच्यासंबंधी वक्तव्याने पुरी येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संबित पात्रा चर्चेत आले. पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

अरुप पटनायक मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. २०१९च्या निवडणुकीतही ते लढले होते. पण, त्यांचा भाजपच्या अपराजिता सारंगी यांनी पराभव केला होता. संबित पात्रा यांनी केलेले वक्तव्य हाच सध्या तेथील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी विरोधकांना टीकेसाठी मुद्दा मिळाला आहे. काँग्रेस आणि बीजेडीसुद्धा भाजपला त्यावरून लक्ष्य करीत आहेत. भाजप आणि बीजेडी यांच्यातच प्रमुख लढत येथे आहे. तृणमूल काँग्रेसनेही पात्रा यांच्यावर टीका करत माफी मागा असे म्हटले आहे.  

इतर काही मुद्देपायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक समस्यांवर लक्ष, आर्थिक विकासाचे मुद्दे मतदारसंघामध्ये चर्चेला आहेत.रेल्वे, महामार्ग, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदींबाबतचे प्रगती पुस्तक पात्रा यांच्याकडून सादर. चार धाम पैकी पुरी एक असल्याने मतदारसंघाला राजकीय महत्त्व. स्थानिक विकासाचे मुद्दे प्रकर्षाने चर्चेला.पात्रा हे बाहेरील उमेदवार असल्याचा आणि पराभवानंतर दिल्लीतच राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये काय झाले?पिनाकी मिश्रा, बीजेडी (विजयी) - ५,३८,३२१संबित पात्रा - भाजप - ५,२६,६०७ 

टॅग्स :OdishaओदिशाSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४