शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

नागरिकत्व सुधारणा विधेयक; सुप्रिया सुळेंनी चूक दाखवली, अमित शहा म्हणाले 'कबुल' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 3:48 PM

नागरिकत्व सुधारणा विधेयकास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे.

नवी दिल्ली - देशात सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाचाची चर्चा होत आहे. गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध केला. त्यावेळी अमित शहांनी तब्बल 6 ते 7 तास या विधेयकावर चर्चा केली. यादरम्यान, त्यांच्याकडून एक चूक झाली होती, जी चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र, राज्यसभेत शिवसेनेनं आपली भूमिका बदलली. गृहमंत्री अमित शहांनी लांबलचक भाषण करुन या विधेयकातील विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी, शेवटच्या भाषणा अमित शहांकडून थोडीशी चूक झाली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी ही चूक शहांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर, शहांनीही चूक कबुल असल्याचं सांगत ती दूरुस्त केल्याचंही स्पष्टीकरण दिलं. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे 2016 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. पण, तेव्हा लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीपुढे मांडण्यात आले. संयुक्त संसदीय समितीमध्ये बोलताना, अमित शाह म्हणाले की, “लोकसभेत या विधेयकावर धर्माच्या मुद्द्यावरुन कोणाचाही आक्षेप नाही.” मात्र, सुप्रिया सुळेंनी अमित शहांच्या या वाक्याला कोट करत धर्माच्या मुद्द्याला आमचा आक्षेप आहे, आम्हीही लोकसभेतील सदस्य आहोत, असे म्हणत अमित शहांची चूक लक्षात आणून दिली. सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अमित शहा यांनी आपली चूक कबुल केली. तसेच, सदरची चूक लक्षात आणून देत या प्रस्तावातील भाषणात मी बदल केल्याचंही अमित शहांनी लोकसभेत विधेयकावरील चर्चेवेळी सांगितले.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा