शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सयामी जुळ्या बहिणींनी केले ‘सामाईक’ मतदान

By admin | Updated: October 28, 2015 22:10 IST

डोक्यापासून खांद्यापर्यंतची शरीरे एकत्र जोडलेल्या साबा आणि फराह या दोन ‘सयामी’ जुळ््या बहिणींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बुधवारी येथे एकाच मतदार ओळखपत्रावर

पाटणा : डोक्यापासून खांद्यापर्यंतची शरीरे एकत्र जोडलेल्या साबा आणि फराह या दोन ‘सयामी’ जुळ््या बहिणींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बुधवारी येथे एकाच मतदार ओळखपत्रावर एकच मतदार म्हणून ‘सामाईक’ मतदान केले.पाटणा शहरात सामानपूरा भागात राहणाऱ्या साबा आणि फराह या सयामी जुळ््या बहिणींनी त्यांच्या घराजवळच्या मतदान केंद्रावर मतदान केले. साबा व फराह या दोन व्यक्ती असल्या तरी त्यांची शरीरे एकत्रित असल्याने त्यांना कायद्यानुसार एकच व्यक्ती मानून दोघींना मिळून एकच मतदार ओळखपत्र जारी करण्यात आले होते. या दोघींनी या एकाच कार्डावर एकच मतदार म्हणून एकच मत दिले.दोन स्वतंत्र मने व भावभावना असलेल्या या दोघींना शरीर एकच असल्याने आयुष्यात अनंत यातना व त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे केले जावे, यासाठी पुण्यातील एक कायद्याची विद्याथिर्नी आरुषी दशमना हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. परंतु शस्त्रक्रिया अत्यंत धोक्याची आहे व त्यामुळे दोघींपैकी एक दगावण्याची भीती आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिल्यानंतर न्यायालयाने शस्त्रक्रियेने त्यांना वेगळे करण्याचा विचार सोडून दिला होता. (वृत्तसंस्था)