शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 18:22 IST

सावरकरांबद्दलच्या विधानानं भाजपा पाठोपाठ शिवसेनादेखील आक्रमक

मुंबई: माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली आहे. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केल्यानं आता शिवसेनादेखील आक्रमक झाली आहे. 



शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. 



झारखंडमध्ये निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर शरंसधान साधलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर आज दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना, मी मेलो तरीही माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे, सावरकर नाही. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन शिवसेनेत नाराजी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस