वॉशिंग्टन : टेस्टोस्टेरॉन हार्मोन कर्करोगाविरुद्ध, ब्रेन ट्यूमरविरुद्ध लढण्यास शरीरास मदत करतो. त्याच्या वाढीला रोखण्याची या हार्मोनमध्ये क्षमता आहे, असा निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका नव्या संशोधनात मांडला आहे. या हार्मोनची कमतरता झाल्यास शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि ट्यूमरला वाढू शकतो, असे त्यात म्हटले आहे.
पुरुषांचे हार्मोनच कदाचित ब्रेन ट्यूमर वाढविण्यास मदत करतात असे डॉक्टरांना वाटत होते. मात्र, त्याच्या अगदी उलट निष्कर्ष मिळाला.
शास्त्रज्ञांनी १३०० हून अधिक कर्करोग रुग्णांचे आरोग्य तपासले, तेव्हा असे आढळून आले की, जे रुग्ण अन्य कारणासाठी टेस्टोस्टेरॉन किंवा सप्लिमेंट घेत होते, ते इतर रुग्णांच्या तुलनेत जास्त काळ जिवंत राहिले.
त्यांच्या जगण्याची शक्यता हार्मोनची कमतरता असलेल्यांपेक्षा अधिक झाली होती. या अभ्यासाने पुरुषांतील हार्मोन या विषयावरील वेगळी माहिती मिळाली.
हार्मोन कमी झाल्यावर मानवी शरीरात काय होते?
जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता होते, तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारची सूज आणि ताण वाढतो. या ताणामुळे मेंदूभोवती एक भिंत तयार होते जी शरीरातील रोगांशी लढणाऱ्या पेशींना आत येऊ देत नाही.
आता जेव्हा रक्षकच आत पोहोचू शकत नाहीत, तेव्हा ट्यूमरला रोखणारे कोणी राहत नाही आणि तो वाढू लागतो. या प्रक्रियेमुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कुंठित होऊन कर्करोगाच्या पेशी वाढतात परिणामी मेंदूची क्षमता झपाट्याने कमी होते.
हा हार्मोन मानवी शरीरात कसे काम करतो?
टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे सुनिश्चित करतो की मेंदूतील रासायनिक प्रक्रिया संतुलित राहील. जेव्हा हा हार्मोन योग्य प्रमाणात असतो, तेव्हा शरीरातील रोगांशी लढणाऱ्या पेशी गरज पडल्यास मेंदूमध्ये जाऊन ट्यूमरवर हल्ला करतात.
संशोधनात असे आढळले की, शरीरात या हार्मोनची कमतरता होताच मेंदूमधील एक विशेष प्रणाली (एचपीए ॲक्सिस) खूप जास्त सक्रिय होते. त्यामुळे मेंदूमध्ये सूज वाढू लागते आणि शरीरात तणाव निर्माण करणारे हार्मोन वेगाने स्रवू लागतात. कवचासारखे कार्य करते.
Web Summary : Testosterone helps fight brain tumors in men, says new research. Hormone deficiency weakens defense, allowing tumor growth. Patients taking testosterone lived longer. It maintains brain balance, enabling immune cells to attack tumors. Deficiency triggers inflammation, hindering tumor suppression.
Web Summary : नए शोध के अनुसार, टेस्टोस्टेरोन पुरुषों में ब्रेन ट्यूमर से लड़ने में मदद करता है। हार्मोन की कमी से बचाव कमजोर होता है, जिससे ट्यूमर बढ़ता है। टेस्टोस्टेरोन लेने वाले मरीज़ अधिक समय तक जीवित रहे। यह मस्तिष्क संतुलन बनाए रखता है, जिससे प्रतिरक्षा कोशिकाएं ट्यूमर पर हमला कर पाती हैं। कमी से सूजन बढ़ती है, ट्यूमर का दमन बाधित होता है।