शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:39 IST

पाच राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. यातील प. बंगाल,  तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, केरळचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागत आहे. 

-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्ली 
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही, किंबहुना, काँग्रेसलाही नाव निश्चित करण्याची कोणतीही घाई नसल्याची चर्चा रंगली आहे.

पाच राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. यातील प. बंगाल,  तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. आसाम, पुद्दुचेरीचेही जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, केरळचामुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागत आहे. 

मुळात, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि महासचिव के. सी. वेणुगोपाल मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून हायकमांडवर दबाव टाकला जात आहे. निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी आमदारांच्या भावना अध्यक्षांना कळविल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले आहेत.

केरळ काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते चर्चेस दिल्लीत रवाना

पक्षाध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगेंनी काही ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले आहे. यात कन्नूरचे लोकसभा सदस्य के. सुधीकरन यांच्याव्यतिरिक्त एम.एम. हसन, व्ही.एम. सुधीरन, मुल्लापल्ली रामचंद्रन आणि के. मुरलीधर यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते ए. के. अँटनींशीही चर्चा होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरगे आणि राहुल गांधी येत्या एक-दोन दिवसांत केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथल यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाते. 

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २३ मेपर्यंत
 
काँग्रेसला मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्याची घाई नाही. कारण, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २३ मेपर्यंत आहे. अशात, मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यासाठी हायकमांडकडे दहा दिवस आहेत. शिवाय, सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, याची काळजी हायकमांडकडून घेतली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala CM Post: Congress High Command Deliberates, Decision Delayed

Web Summary : A week after Kerala's election results, Congress High Command struggles to decide on a Chief Minister. Key contenders include V.D. Satheesan and K.C. Venugopal. Senior leaders are consulting in Delhi. A final decision is expected soon, avoiding internal rebellion.
टॅग्स :KeralaकेरळKerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६congressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीRahul Gandhiराहुल गांधी