शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:21 IST

‘जिथले श्रीमंत लोक नियमितपणे सार्वजनिक वाहतूक वापरतात, तो खरा प्रगत देश. जिथल्या गरिबांकडे मोटारी असतात, तो नाही !’

-मेघना भुस्कुटे (ब्लॉगर, भाषांतरकार)
शहरांच्या वेगात मोठी भूमिका त्यातल्या दळणवळणाच्या साधनांची असते. वेग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गोळीच्या वेगानं सणाणत निघालेल्या बुलेट ट्रेनचं चित्रच काय ते येतं. पण दळणवळणाच्या साधनांचा वेग शहरांच्या वेगासाठी तितका महत्त्वाचा नसतोच.

गोंधळलात ना ?! एक मिनिट ! पण खरंच. बस किंवा टॅक्सी किंवा ट्रेन ताशी किती किमी वेगानं धावते, हे महत्त्वाचं नसतं. शहर दीर्घकाळ सुरळीत चालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वेग नाही, तर इतर अनेक घटक जास्त महत्त्वाचे असतात. 

एकाच एक प्रकारची वाहतूक आहे की त्या त्या भागाच्या वापराला आणि भूगोलाला अनुसरून बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, टमटम, मेट्रो, दुचाकी वाहनं, खासगी वाहनं.. इत्यादी प्रकारांचं यथायोग्य मिश्रण आहे? ते सर्वसामान्य माणसांना सहज वापरता येईल असं नि इतकं स्वस्त आहे का ? 

वाहतूक प्रकारांची ही जाळी आपापसांत ‘बोलतात’ का – म्हणजे ट्रेन आहे, पण कनेक्टिंग बस नाही, म्हणून ताटकळत बसावं लागतं, असं तर होत नाही ना? प्रवास सुखदायक आहे का? की रोज जिवाची बाजी लावावी लागते प्रवासात? उपलब्धतेत सातत्य आहे का ? असे अनेक प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील, तर शहरं सुरळीत धावतात.

असं म्हणतात, सार्वजनिक वाहतुकीवर आज खर्चलेला एक रुपया नजीकच्या भविष्यकाळात शहरांच्या अर्थव्यवस्थेला पाच रुपये कमावून देतो. जर्मनीत २०२२ साली झालेला ‘९-युरो तिकीट’ नावाचा यशस्वी प्रयोग पुष्कळ बोलका आहे. 

जर्मनीतल्या शहरांत उपनगरी रेल्वे, जमिनीखालून जाणारी मेट्रो, ट्रॅम, उपनगरी बस अशी बहुरंगी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आहे. ९ युरोंचं तिकीट घ्या नि यातल्या कुठल्याही वाहनांतून एक दिवस कितीही प्रवास करा, अशी एक योजना त्यांनी काही शहरांत जाहीर केली. हे फार स्वस्त, सोयीस्करही होतं. 

महागड्या गाड्या बाळगायची आणि रहदारीच्या किचकिचाटात अडकून पडायची सक्ती टाळून बरेच लोक सार्वजनिक वाहनांनी ये-जा करायला लागले. वेळ, पैसे, ताकद तर वाचलीच. पण प्रदूषणही कमी झालं. मग तो प्रयोग जर्मनीभर राबवण्यात आला. युरोपात सगळीकडेच त्याची पुनरावृत्ती झाली. लक्झेंबर्गमधल्या मंडळींनी त्यांची सार्वजनिक वाहतूक पूर्णतः चकटफू करून टाकली. 

फ्रान्समधल्या शहरांत खाजगी पार्किंगसाठी राखलेले भले-दांडगे भूखंड आणि इमारती काढून घेण्यात आल्या आणि त्या सार्वजनिक वापराला खुल्या केल्या. ‘जिथले श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक वापरतात, तो खरा प्रगत देश. जिथल्या गरिबांकडे मोटारी असतात, तो नाही!’ हे कोलंबियाच्या राजधानीच्या – बोगोटाच्या  महापौरांचं विधान आणि त्यांचे शहररचनेतले प्रयोगही असेच प्रसिद्ध आहेत. 

हे सगळे प्रयोग सरकारी कल्पकपणातून, सार्वजनिक वाहतुकीत केलेल्या गुंतवणुकीतून, जबाबदार नागरी सहभागातून केले गेले – यशस्वीही झाले. त्या प्रयोगांना ‘फुकटेपणा’ वा ‘रेवड्यावाटप’ अशी लेबलं लावली गेली नाहीत. त्याचा फायदा त्या शहरांच्या नागरिकांना झाला. 

वेगासाठी त्यांनी धुराची-धुळीची किंमत मोजली नाही, रोजच्या प्रवासासाठी प्राणांची बाजी लावली नाही, वा स्वतःच्या खिशातून भरमसाठ पैसाही मोजला नाही. आपण या प्रयोगांतून प्रेरणा कधी घेणार आहोत? की आपल्याला मोठाल्या, सुळसुळीत, वेगवान, महागड्या, नि खाजगी गाड्यांचं वेड - आणि पर्यायानं त्यातून येणारे ट्रॅफिकचे, प्रदूषणाचे, गर्दीचे प्रश्न आवडायला लागले आहेत?
meghana.bhuskute@gmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Smooth city functioning: Public transport, affordability, and integrated systems key.

Web Summary : Cities thrive on efficient, affordable, and integrated public transport, not just speed. Germany's '9-Euro ticket' proves accessible systems boost economies and reduce pollution. Investment, smart planning, and public participation are crucial for success, offering alternatives to costly private vehicles.
टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकcivic issueनागरी समस्या