शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 22:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ मे पासून चार महत्त्वाच्या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत.

PM Narendra Modi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ मे ते २० मे २०२६ या काळात पाच महत्त्वाच्या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. भारताचे वाढते जागतिक महत्त्व आणि आर्थिक संबंधांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पहिला टप्पा: संयुक्त अरब अमिराती – १५ मे

दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान मोदी १५ मे रोजी युएईपासून करतील. येथे ते युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील. भारत आणि युएईमधील व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीवर या बैठकीत चर्चा होईल. आखाती देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर पंतप्रधान मोदींचा भर असेल.

दुसरा टप्पा: नेदरलँड – १५ ते १७ मे

नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी १५ ते १७ मे दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्यावर असतील. नेदरलँड हा युरोपमधील भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. जल व्यवस्थापन, कृषी तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर उद्योगातील सहकार्यावर येथे स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. नेदरलँड हा भारताचा युरोपमधील मोठा व्यापारी मार्ग असून दोन्ही देशांत २७.८ अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. ५५.६ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह नेदरलँड हा भारताचा चौथा मोठा गुंतवणूकदार आहे.

तिसरा टप्पा: स्वीडन – १७ ते १८ मे

स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान १७ मे रोजी स्वीडनमधील गॉटेनबर्ग येथे पोहोचतील. संरक्षण उत्पादन, शाश्वत ऊर्जा आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रातील भारत-स्वीडन भागीदारी वाढवण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. स्वीडनची भारतात २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे

चौथा टप्पा: नॉर्वे आणि भारत-नॉर्डिक शिखर परिषद – १८ ते १९ मे

१८ आणि १९ मे रोजी पंतप्रधान नॉर्वेमध्ये असतील. येथे ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. ओस्लो येथे होणाऱ्या या परिषदेत नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड आणि स्वीडन या ५ देशांचे पंतप्रधान सहभागी होतील. ब्लू इकॉनॉमी, हवामान बदल आणि ग्रीन हायड्रोजन या विषयांवर भारत या देशांशी संवाद साधेल.

पाचवा टप्पा: इटली दौरा – १९ ते २० मे

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इटलीला भेट देतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. भारत आणि इटलीमध्ये सध्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपवर भर दिला जात आहे. संरक्षण, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वाची चर्चा होईल.

या दौऱ्याचे जागतिक महत्त्व

युरोपीय देशांकडून भारतात गुंतवणूक वाढवण्यासाठी हा दौरा एक मोठी संधी आहे. तसेच स्वीडन आणि इटली यांसारख्या देशांसोबतचे संरक्षण करार भारताच्या लष्करी सज्जतेसाठी महत्त्वाचे आहेत. यासोबतच सध्याच्या जागतिक इंधन संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मोदींचा हा दौरा महत्त्वाचा ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's Europe & Middle East Visit: Strengthening India's Global Power.

Web Summary : PM Modi's five-nation tour aims to bolster India's global presence. He will visit UAE, Netherlands, Sweden, Norway and Italy, focusing on trade, energy, defense, and strategic partnerships to enhance India’s economic and geopolitical influence.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीItalyइटली