दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या सामन्यात प्रियांश आर्यनं दमदार सुरुवात करून दिल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरनंही नाबाद अर्धशतकी नजराणा पेश केला. धावांचा पाठलाग करताना ४ अर्धशतके झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरनं यंदाच्या हंगामात पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिले अर्धशतक झळकावले. पंजाब किंग्सच्या डावातील १८ व्या षटकात माधव तिवारीच्या गोलंदाजीवर षटकार मारत अय्यरनं ३२ चेंडूत यंदाच्या हंगामातील पाचव्या अर्धशतकाला गवसणी घातली. त्याच्या या दमदार खेळीला स्टेडियम स्टँडमध्ये उपस्थितीत प्रीती झिंटानेही दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
श्रेयस अय्यरच्या कडक अर्धशतकानंतर 'पिक्चर'मध्ये आली प्रिती; व्हिडिओ व्हायरल
श्रेयस अय्यरच्या कडक अर्धशतकी खेळीनंतर पंजाब किंग्सची संघ मालकीण प्रिती झिंटा पिक्चरमध्ये आली. हिमाचल प्रदेशातील माहोलमध्ये संघाला चीअर करण्यासाठी ती अगदी पहाडी लूकमधील अंदाजात स्टेडियमवर पोहचली होती. कर्णधाराच्या खेळीला तिने टाळ्या वाजवून दाद दिली. हा खास क्षण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
अय्यरची कमाल; अर्धशतकासह कोहली-द्रविड यांच्या पंक्तीत
श्रेयस अय्यरनं २०२५ ते २०२६ या काळात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग तिसरे अर्धशतक झळकावले. या कामगिरीसह त्याने विराट कोहली आणि राहुल द्रविड या दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीनं २०१२ ते २०१३ आणि २०१६ ते २०१७ या हंगामात दोन वेळा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सलग तीन अर्धशतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. राहुल द्रविडनं २०१२-१३ च्या हंगामात दिल्लीविरुद्ध सलग ३ अर्धशतके झळकावली होती.
अय्यर-प्रियांशशिवाय सूर्यांशची फटकेबाजी
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य याने ३३ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केलेल्या ५६ धावांच्या खेळीनंतर श्रेयस अय्यरनं ३६ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी करताना ५ चौकार आणि ३ षटकार खेचले. याशिवाय कूपर कॉलॉनी याने २७ चेंडूत ३८ धावांसह अखेरच्या षटकात सूर्याश शेडगे याने ८ चेंडूत केलेल्या नाबाद २१ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २१० धावा केल्या.
Web Summary : Shreyas Iyer's unbeaten fifty and Priyansh Arya's fiery start propelled Punjab Kings. Preity Zinta, in 'Pahadi' attire, cheered. Iyer equaled Kohli and Dravid with consecutive fifties against Delhi Capitals. Punjab scored 210, thanks to Iyer, Arya, and Suryansh's quickfire innings.
Web Summary : श्रेयस अय्यर के नाबाद अर्धशतक और प्रियांश आर्य की तूफानी शुरुआत से पंजाब किंग्स आगे बढ़ी। प्रीति जिंटा 'पहाड़ी' अंदाज में दिखीं। अय्यर ने दिल्ली कैपिटल्स के खिलाफ लगातार अर्धशतक बनाकर कोहली और द्रविड़ की बराबरी की। पंजाब ने अय्यर, आर्य और सूर्यांश की तेज पारी से 210 रन बनाए।