Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव

प्रियांश आर्य याने दुसऱ्यांदा साधला हा डाव, यशस्वी जैस्वाल अव्वल

By सुशांत जाधव | Updated: May 11, 2026 20:31 IST

Open in App

PL 2026 PBKS vs DC Priyansh Arya Second Time Smashed Six Off First Ball See Recod : धरमशाला येथील मैदानात पंजाब किंग्सच्या संघातील अनकॅप्ड सलामीवीर प्रियांश आर्य याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारत खाते उघडले. IPL मध्ये मोजक्याच खेळाडूंनी डावातील पहिल्या चेंडूवर षटकार मारला आहे. प्रियांश आर्यनं दुसऱ्यांदा ही कामगिरी करताना स्टार्कच्या षटकात २२ धावा कुटल्या. आक्रमक खेळी कायम ठेवत त्याने २४ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

प्रियांश आर्य याने दुसऱ्यांदा साधला हा डाव, यशस्वी जैस्वाल अव्वल

प्रियांश आर्य हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत ६ चेंडूत ६ षटकार मारल्यावरच तो चर्चेत आला होता. याच कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने या खेळाडूवर कोट्यवधीचा डाव खेळला होता. IPL मध्ये दुसऱ्यांदा त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी जैस्वाल या यादीत अव्वलस्थानी आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून यशस्वीनं चार वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्याचा रेकॉर्ड प्रियांश आर्यच्या अगदी टप्प्यात आहे.

आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष

मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीसह या खेळाडूंचा समावेश

नमन ओझा हा IPL मध्ये डावाच्या सुरुवात करताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा पहिला फलंदाज आहे. २००९ च्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ब्रॅड हॉज गोलंदाजीवर हा पराक्रम केला होता. त्यानंतर १० वर्षांनी आरसीबीकडून विराट कोहलीनं २०१९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील गोलंदाज वरुण ॲरोनच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारत खाते उघडले होते. या यादीत फिल सॉल्ट, सनील नरेन, संजू सॅमसन रॉबिन उथप्पा आणि मयंक अग्रवाल यांचाही समावेश आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyansh Arya's explosive start: Smashes six, joins Kohli in elite list.

Web Summary : Priyansh Arya stunned with a six off the first ball against Mitchell Starc, marking his second such feat in IPL. He joins an elite list including Virat Kohli. Naman Ojha was the first to achieve this in IPL history. Yashasvi Jaiswal leads with four such instances.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्स