शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:02 IST

West Bengal CM Suvendu Adhikari Govt First Cabinet Meeting: टीएमसी सरकारने संविधानाचा आणि जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली.

West Bengal CM Suvendu Adhikari Govt First Cabinet Meeting: शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचेमुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी कामाला लागले. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य याबाबत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करणे आणि बांगलादेश सीमेवर सुरक्षेसाठी जमीन हस्तांतरण करणे अशा निर्णयांचा समावेश आहे. 

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील सगळे मतदार, निवडणूक आयोग आणि या प्रक्रियेत सहभागी झालेले सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील लोकसंख्या लक्षात घेता आमच्या मंत्रिमंडळाने सीमा कुंपणासाठी बीएसएफला आवश्यक जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्य सचिव आणि राज्य भूमी व महसूल विभागाच्या सचिवांना पुढील ४५ दिवसांत जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

टीएमसी सरकारने संविधानाचा आणि जनतेचा विश्वासघात केला

टीएमसी सरकारने संविधानाचा आणि जनतेचा विश्वासघात केला. महिलांना आरक्षण मिळू नये म्हणून बंगालमधील जनगणना प्रक्रिया हेतुपुरस्सर थांबवली. मात्र आता मंत्रिमंडळाने राज्यात या परिपत्रकाच्या तात्काळ अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. पूर्वीच्या आयपीसी आणि सीआरपीसीची जागा घेणारा भारतीय दंड संहिता, म्हणजेच नवीन फौजदारी कायदा, राज्यात टीएमसी सरकारने अधिकृतपणे लागू केला नव्हता आणि नवीन कायदा लागू करण्यासाठी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय

१. आयुष्मान भारत योजना लागू केली जाणार. ही योजना राबवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार.

२. नियमांनुसार आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षणात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार.

३. भारतीय न्यायिक संहिता आजपासून लागू होईल. 

४. सीमावर्ती भागातील जमीन हस्तांतरणाचे काम आजपासून सुरू होणार. ४५ दिवसांत जमीन बीएसएफकडे हस्तांतरित केली जाणार.

५. बंगालमध्ये प्राण गमावलेल्या ३२१ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी सरकार घेणार. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Suvendu Adhikari's first cabinet meeting: Key decisions on security, health.

Web Summary : Suvendu Adhikari's first cabinet meeting prioritized national security and health. Key decisions included implementing the Ayushman Bharat scheme, land transfer for border security, and implementing the Indian Penal Code. Support for families of deceased BJP workers was also pledged.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा