शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:57 IST

२७ मार्च रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या बालेन शाह यांनी अवघ्या दीड महिन्यात भारताची डोकेदुखी वाढवली आहे.

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी सत्ता हाती घेताच भारतासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. २७ मार्च रोजी पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यापासून गेल्या ४५ दिवसांत बालेन शाह यांनी एकापाठोपाठ एक असे ४ निर्णय घेतले आहेत, जे थेट भारताच्या हिताला बाधा आणणारे मानले जात आहेत. काठमांडूचे महापौर असताना 'आदिपुरुष' चित्रपटाला विरोध करणारे आणि 'ग्रेटर नेपाळ'चा नकाशा शेअर करणारे बालेन शाह आता पंतप्रधान म्हणून भारतासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.

भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यास नकार

मुत्सद्देगिरीच्या इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी घटना नुकतीच घडली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे नेपाळ दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा होता. मात्र, बालेन शाह यांनी मिस्री यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. "मी फक्त माझ्या समकक्ष (पंतप्रधान) पदाच्या व्यक्तीशीच चर्चा करेन," अशी ताठर भूमिका शाह यांनी घेतल्याने विक्रम मिस्री यांचा नेपाळ दौरा रद्द करावा लागला.

लिपुलेख-कालापानी वादाची पुनरावृत्ती

केपी शर्मा ओली यांच्या काळात गाजलेला कालापानी आणि लिपुलेख सीमावाद बालेन शाह यांनी पुन्हा एकदा उकरून काढला आहे. मानसरोवर यात्रेवरून चीनने जारी केलेल्या ॲडव्हायझरीचा संदर्भ देत शाह यांनी या भागावर नेपाळचा दावा ठोकला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कडक भाषेत प्रतिक्रिया दिली असून, हा मुद्दामहून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

गरिबांच्या पोटावर पाय; १०० रुपयांवर 'कस्टम ड्यूटी'

भारत-नेपाळ सीमेवरील तराई भागात राहणारे नेपाळी नागरिक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय बाजारपेठांवर अवलंबून असतात. मात्र, बालेन सरकारने आता एक जाचक नियम लागू केला आहे. जर भारतीय सीमेवरून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान नेपाळमध्ये नेले, तर त्यावर 'कस्टम ड्यूटी' भरावी लागणार आहे. यामुळे सीमावर्ती भागातील सामान्य नेपाळी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सीमेवर 'ओळखपत्रा'ची सक्ती

भारत आणि नेपाळमध्ये १७५१ किलोमीटरची खुली सीमा आहे, जिथून नागरिक सहज ये-जा करत असत. मात्र, आता बालेन शाह यांनी भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य केले आहे. कडक सुरक्षा तपासणीशिवाय आता कोणत्याही भारतीयाला नेपाळमध्ये प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील 'रोटी-बेटी'च्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal PM's anti-India stance: Four major decisions in 45 days.

Web Summary : Nepal's PM Balen Shah, since assuming office, has strained relations with India. Key decisions include denying meeting Indian Foreign Secretary, reviving border disputes, imposing customs duty, and enforcing ID checks, impacting Indo-Nepal ties.
टॅग्स :NepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीय