शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 06:53 IST

Andhra Pradesh lok sabha election: मालमत्तेवर कायमस्वरूपी मालकी आणि वाद कमी करण्यासाठी हा कायदा आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याचे समर्थन केले आहे. विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण यांनी या कायद्याचा विरोध केला आहे.

डॉ. समीर इनामदारलोकमत न्यूज नेटवर्कविजयवाडा : आंध्र प्रदेश जमीन शीर्षक कायदा हा आंध्र प्रदेश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा मुद्दा बनला असून, यावर दोन्ही बाजूंनी जोरदार वाकयद्ध सुरू आहे. आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील सर्व जमिनींची नोंदणी अनिवार्य केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पुनः सर्वेक्षण सुरू आहे. आंध्र प्रदेशात जमीन शीर्षक कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे. 

मालमत्तेवर कायमस्वरूपी मालकी आणि वाद कमी करण्यासाठी हा कायदा आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याचे समर्थन केले आहे. विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण यांनी या कायद्याचा विरोध केला आहे.

तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), वकील आणि इतर कार्यकर्त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण यांनी यावर टीका केली आहे. आमचा पक्ष सत्तेवर आल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात येईल, असे नायडू यांनी सांगितले.या निवडणुकीत हा प्रश्न विरोधी पक्षांनी जोरदारपणे मांडला आहे. 

करा वा मरा स्थितीवायएसआरला सत्ताविरोधी काही गोष्टींचा सामना करावा लागत आहे; परंतु पक्षाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांवर सहानुभूती मिळेल, अशी त्यांना आशा आहे. महागाई, बेरोजगारी आणि व्यापक विकासाचा अभाव यावर एनडीए अग्रभागी आहे. सर्वच पक्षांसाठी करा वा मरा अशी स्थिती आहे.

विकासाचा मुद्दावायएसआर काँग्रेस आल्यापासून मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचा मुद्दा जगन मोहन रेड्डी मांडत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री म्हणून अधिक गुन्हेगारी खटले प्रलंबित असलेला आणि जामिनावर पाच वर्षांपेक्षा जास्त काळ जामिनावर बाहेर असलेला नेता असणे दुर्दैवी असल्याचे नायडू यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

प्रचारात रंगत१३ मे रोजी १७५ विधानसभा, २५ लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, कोणत्याही पक्षाने कसर सोडली नाही. वायएसआर काँग्रेसला तेलुगू देसम पार्टी, जनसेना पार्टी आणि भाजप यांची युती टक्कर देत आहे.

टॅग्स :andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४