शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:31 IST

प्रार्थनासभेतच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन.

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनंतर आता राजस्थानातील भजनलाल शर्मा यांच्या सरकारनेही शाळकरी मुलांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन अनिवार्य केले आहे. मुलांना सोशल मीडियापासून दूर करण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, शाळांच्या प्रार्थनेच्या वेळेत दररोज १० मिनिटे महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि क्रीडाविषयक बातम्यांचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी दररोज पाच नव्या शब्दांची माहिती मुला-मुलींना देण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर सोपवण्यात येईल. 

उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कमीतकमी दोन वर्तमानपत्रे (एक इंग्रजी आणि एक हिंदी), तर प्रत्येक शासकीय उच्च प्राथमिक शाळेत हिंदी भाषेतील दोन वर्तमानपत्रे मागवावीत, असे निर्देश सरकारने जीआरद्वारे दिले आहेत. अशाच प्रकारे इग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये दोन वर्तमानपत्रे मागवावीत, असे जीआरमध्ये म्हटले आहे. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रीय पातळीवरील एका इंग्रजी आणि एका हिंदी वर्तमानपत्राचे वाचन केले जाईल. 

शब्दसाठा वाढवण्याचा प्रयत्न

वर्तमानपत्र वाचनादरम्यान विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. रोज पाच नवे शब्द निवडावेत. त्यांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगावेत आणि त्यांचा वाक्यात उपयोगही शिकवावा, अशी सूचना शिक्षकांना दिली आहे.

सामान्य ज्ञानात भर

वाचनामुळे वर्तमानपत्रांची आवड निर्माण हाेऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल. भाषेबरोबरच विचार करण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त हाेत आहे. 

खर्चाचा भार शाळांवर नाही

वर्तमानपत्राचा सर्व खर्च राजस्थानशिक्षण परिषद करणार आहे. त्यामुळे शाळा, संस्थांवर भार पडणार नाही. विद्यार्थ्याला वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी राज्य सरकारची  अपेक्षा आहे.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी    

आजच्या बदलत्या युगात मुले आपला जास्तीत जास्त वेळ मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवतात. परिणामी त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्र वाचण्याचा हा उपक्रम मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवून ज्ञानाकडे नेण्याचा चांगला प्रयत्न आहे. वर्तमानपत्र वाचनामुळे केवळ मुलांच्या माहितीतच भर पडत नाही, तर त्यांची वाचनाची गती, समज आणि भाषा याबाबतीतही सकारात्मक बदल घडतो, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांचे वाचन करण्यास लावण्याबरोबरच त्यांच्या भाषा सुधारणेवरही भर दिला जाईल. त्यासाठी शिक्षकही विद्यार्थ्यांना वाचनाच्या पद्धती शिकवतील.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Makes Newspaper Reading Mandatory for Students in Schools

Web Summary : Rajasthan mandates newspaper reading in schools to boost knowledge and vocabulary. Students will read national, international, and sports news daily. The government aims to keep students away from social media and improve their language skills, with the education council covering costs.
टॅग्स :Rajasthanराजस्थानSchoolशाळाEducationशिक्षणJournalistपत्रकार